घरक्रीडाएकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने पटकावलं 'पालकमंत्री चषक'

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने पटकावलं ‘पालकमंत्री चषक’

Subscribe

कोव्हीड महामारीमुळे दोन वर्षांच्या खंडानंतर रंगलेल्या पालकमंत्री चषक टिपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या निर्णायक लढतीत गोलंदाजांनी बजावलेल्या कामगिरीला फलंदाजांकडून फलंदाजांनी तोलामोलाची साथ दिल्यामुळे एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने अ संघाचा आठ विकेट्सनी पराभव करत विजेतेपद कायम राखले. महाराष्ट्र माझा सेवा संस्थेच्या वतीने दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृहात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाच्या गोलंदाजांनी अ संघाच्या फलंदाजांना वरचढ होण्याची संधीच मिळू दिली नाही. ध्रुमिल मटकरने अवघ्या १९ धावांत ४ विकेट्स मिळवत अ संघाला २० षटकात ८ बाद १३८ धावांवर रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली. अतुल सिंग आणि सिध्दांत सिंगने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. जयदीप परदेशीने २४, जपप्रीत रंधवाने ३७ आणि एकनाथ केरकरने ३६ धावा केल्या.
आपल्या वरिष्ठ संघाने दिलेल्या विजयाचे लक्ष्य ब संघाने १३.२ षटकात २ बाद १३९ धावा करत पूर्ण केले. ओमकार जाधवने गोलंदाजांवर हल्लाबोल करताना ४१ चेंडूत नाबाद ७१ धावा केल्या.

- Advertisement -

आपल्या नाबाद अर्धशतकी खेळीत ओमकारने ११ चौकार आणि एक षटकार मारला. अक्षय सरदेसाईने पाच षटकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ३७ धावा केल्या. अर्जुन शेट्टीने दोन षटकार ठोकत १४ धावा केल्या. रॉयस्टन डायस आणि निपुण पांचाळने प्रत्येकी एक विकेट मिळवली. ओमकार जाधवला सामनावीर तर ध्रुमिल मटकरला सामन्यातील गेम चेंजर खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ठाणे महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका नम्रता भोसले यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या क्रिडा समितीचे माजी सभापती व नगरसेवक विकास रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

फलंदाज : ओमकार जाधव
गोलंदाज : सिध्दांत सिंग
क्षेत्ररक्षक : चिन्मय सुतार
मालिकावीर : जयदीप परदेशी

- Advertisement -

हेही वाचा : Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी! केंद्राकडून नियमात मोठे बदल, जाणून घ्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -