घरक्रीडाENG vs AUS : जास्त मैत्रीपूर्ण होऊ नका, थोडे आक्रमक व्हा; मायकेल...

ENG vs AUS : जास्त मैत्रीपूर्ण होऊ नका, थोडे आक्रमक व्हा; मायकेल वॉनचा इंग्लिश संघाला सल्ला

Subscribe

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये ॲशेस मालिकेचा थरार सुरू आहे

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये ॲशेस मालिकेचा थरार सुरू आहे. पहिल्या दोन सामन्यात झालेल्या दारूण पराभवानंतर इंग्लिश संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉनने इंग्लंडच्या संघाला आक्रमक होण्याचा सल्ला दिला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनच्या म्हणण्यानुसार त्याच्या देशातील खेळाडू ऑस्ट्रेलियाविरूध्द ॲशेस मालिकेत खूप जास्त मैत्रीपूर्ण होत आहेत. त्यामुळे जर इंग्लिश संघाला आगामी बॉक्सिंग डे कसोटीत पुनरागमन करायचे असेल तर त्यांना कठोर व्हावे लागेल. इंग्लंडला पहिल्या दोन कसोटी सामन्यांत दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे इंग्लिश संघ पाच सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पिछाडीवर गेला आहे.

५१ कसोटी सामन्यांमध्ये २६ विजय मिळवून इंग्लंडचे नेतृत्व करणाऱ्या वॉनने एका कार्यक्रमात सांगितले की, “ते थोडे जास्तच चांगले झाले आहेत.”

- Advertisement -

इंग्लिंश खेळाडूंना आक्रमक व्हावे लागेल

वॉनने म्हटले की, “मी सामन्याच्या सकाळी पाहतो तर ते सर्वजण मिचेल स्टार्क आणि नाथन लायनशी चर्चा करत होते. मी स्टीव्ह वॉशी खेळादरम्यान कधीच चर्चा केली नव्हती. सामन्याच्या सकाळी ग्लेन मॅकग्रा किंवा शेन वॉर्नशी बोलण्याची माझी हिम्मत झाली नाही. हे सगळे मैत्रीपूर्ण आहे. मात्र मी त्यांच्यासोबत आक्रमक रूप धारण करायचो. इंग्लंडच्या संघाला मैदानावरील रूप बदलायला हवे. त्यांना वेळप्रसंगी वाईट बनले पाहिजे, त्यांनी ताकद दाखवायला हवी”.

दरम्यान, आणखी एक माजी कर्णधार मायकेल अथर्टनने म्हटले की, इंग्लंडची खराब कामगिरी अशीच सुरू राहिली तर जो रूटला कर्णधारपद गमवावे लागू शकते. रूटच्या नेतृत्वात इंग्लंडच्या संघाने २३ कसोटी सामने गमावले आहेत. अथर्टनने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, “जर दौऱ्यातील खराब प्रदर्शन असेच चालू राहिले तर रूट कर्णधार पदावर राहणे कठिण आहे.”

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -