घरक्रीडाENG VS IND 4TH TEST : जखमी असूनही अँडरसनने हार मानली नाही

ENG VS IND 4TH TEST : जखमी असूनही अँडरसनने हार मानली नाही

Subscribe

गोलंदाजी करताना गुडघ्यातुन रक्तस्त्राव, चाहत्यांनी केला सलाम

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा चौथा सामना लंडनच्या ओवल मैदानात खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लिश गोलंदाजांनी कर्णधाराच्या निर्णयाला साजेशी कामगिरी करत भारतीय संघाला अवघ्या १९१ धावांवर गुंडाळले.

दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन पहील्या डावात काही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याच्या खात्यात फक्त १ विकेट आली. त्याने चेतेश्वर पुजाराला बाद केले. अँडरसनने ११ व्या वेळी चेतेश्वर पुजाराला पॅव्हेलियन मध्ये धाडले आहे. त्याच दरम्यान सोशल मिडीयावर अँडरसनचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसला त्या फोटोत त्याच्या ट्राऊजवर गुडघ्याच्या इथे रक्ताचे डाग दिसून आले. सामन्यादरम्यान कॅमेरामॅन ने हे क्षण टिपले. अँडरसनच्या या धाडसाकडे पाहता क्रिकेट चाहत्यांनी त्याला सलाम केला आहे.

- Advertisement -

कसोटीच्या पहिल्या डावात भारताचं पुनरागमन

भारताच्या १९१ धावा या इंग्लंडचे प्रदर्शन पाहता माफक वाटत होत्या. पण भारताच्या गोलंदाजांनी यावेळी संघाला पुनरागमन करण्याची संधी मिळवून दिली. कारण गोलंदाजांनी यावेळी भेदक मारा केल्यामुळे भारताला पहिल्या दिवशी चांगले यश मिळवता आले. भारताच्या मार्गातील मोठा काटा हा इंग्लंडचा कर्णधार जो रुट हा समजला जातो. कारण गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये रुटने शतकं झळकावलेली आहेत. पण चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात मात्र रुटला २१ धावांवर बाद करत भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने मोठे यश मिळवून दिले. त्यापूर्वी जसप्रीत बुमराने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना झटपट आऊट करत इंग्लंडला दुहेरी धक्के दिले होते. पण यावेळी रुटला बाद करत उमेशने इंग्लंडला मोठा धक्का दिला आहे. रुटने पहिल्या डावाची जबरदस्त सुरुवात केली होती. रुटने २५ चेंडूंत चार चौकारही लगावले होते. पण त्याला २१ धावांमध्ये समाधान मानावे लागल्यामुळे भारताला आता चौथ्या कसोटीत आघाडी घेण्याची नामी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतीय संघ या संधीचा फायदा कसा उचलतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडची ३ बाद ५३ अशी स्थिती आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा : Tokyo Paralympics: अवनी लेखराने रचला इतिहास, सुवर्णपदकानंतर कांस्य पदकाची कमाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -