Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा ENG VS IND TEST 4TH : जसप्रीत बुमराहचा नवा विक्रम

ENG VS IND TEST 4TH : जसप्रीत बुमराहचा नवा विक्रम

भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० विकेट्स

Related Story

- Advertisement -

भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारतासाठी एक नवा विक्रम केला आहे, जे आतापर्यंत मोठे मोठे दिग्गज गोलंदाज करु शकले नाही ते बुमराहने करुन दाखवले आहे. बुमराह भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.

भारतीय संघ सध्या इंग्लंड़ विरुद्ध पाच टेस्ट मॅचच्या सीरीजची चौथी मॅच करत आहे. परंतु या संपूर्ण सिरीजमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चमकदार कामगिरी केली आहे. यासह आता जसप्रीत बुमराहने भारताकडून खेळताना एक मोठा विक्रम केला आहे.

- Advertisement -

बुमराहने केवळ २४ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्याच्यापेक्षा वेगवाने हा विक्रम आतापर्यंत कोणी करू शकलेला नाही. या विक्रमात बुमराहने मोठ्या नामवंत गोलंदाजांना मागे टाकले आहे. आता पर्यंत २४ सामन्यात १०२ विकेट्स त्याने पटकावल्या आहेत.

इंग्लंडच्या ऑली पोपला बाद करत रचला इतिहास

जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या ऑली पोपला बोल्ड करत १०० विकेट्स मिळवण्याचा विक्रम केला आहे. खास गोष्ट म्हणजे बुमराहने आपली पहिली आणि शंभरावी विकेट फक्त बोल्ड द्वारे घेतली. बुमराहने महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सला गोलंदाजी करून पहिली कसोटी विकेट घेतली होती.

बुमराहने कपिल देवलाही मागे टाकले

- Advertisement -

बुमराहने सर्वात वेगवान 5 विकेट घेण्याच्या बाबतीत टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देवलाही मागे टाकले आहे. कपिल देवने २५ कसोटी सामन्यांमध्ये १०० बळी घेतले होते, याशिवाय इरफान पठाणने २८ सामन्यांत १००, मोहम्मद शमीने २९ सामन्यात १००, जवागल श्रीनाथने ३० आणि इशांत शर्माने ३३ सामन्यात १०० बळी घेतले. पण आता जसप्रीत बुमराह या सर्व दिग्गज गोलंदाजांच्या पुढे आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यानंतर लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा पराभव केला. मात्र, तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने पुनरागमन केले आणि एकतर्फी पद्धतीने सामना जिंकला आणि चौथा कसोटी सामना भारताने आपल्या नावे केला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाचवा सामना १० सप्टेंबरला मेंचेस्टर येथे खेळवला जाणार आहे.


हेही वाचा : ENG VS IND TEST 4TH : टीम इंडियाने घडविला इतिहास, ५० वर्षांनी ओव्हलवर विजयी

ICC T20 WORLD CUP : पाकिस्तान संघाला मोठा धक्का, मिस्बाह आणि वकार युनूस यांचा राजीनामा

- Advertisement -