ENG vs PAK FINAL: टी-20 वर्ल्ड कप इंग्लंडच्या नावे, 12 वर्षांनी ठरला जगज्जेता

इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम कुरन आणि लेग-स्पिनर आदिल रशीद यांच्या किलर बॉलिंगसमोर पाकिस्तानचा संघ 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 8 गडी बाद 137 धावाच करू शकला

टी 20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने शानदार विजय मिळवलाय. इंग्लंडने पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला 138 धावांवर रोखले. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने पाकिस्तानला हरवून तब्बल 12 वर्षांनंतर ट्रॉफीवर कब्जा केला. इंग्लंडने सामना जिंकण्यासाठी कडवी झुंज दिली असली तरी इंग्लंडकडून बेन स्टोक्सने शानदार खेळी केली आणि आपल्या संघाला विश्वविजेते बनवले.

टी-20 विश्वचषक 2022 च्या इंग्लंड विरुद्धच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांचा पर्दाफाश झाला. इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम कुरन आणि लेग-स्पिनर आदिल रशीद यांच्या किलर बॉलिंगसमोर पाकिस्तानचा संघ 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 8 गडी बाद 137 धावाच करू शकला. पाकिस्तानकडून मसूदने 38 आणि बाबर आझमने 32 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडसाठी कमी धावसंख्येचा हा सामनाही खूप कठीण होता. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीने इंग्लंडच्या सर्व फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. मात्र, बेन स्टोक्स नावाच्या इंग्लंडच्या फलंदाजाने शेवटपर्यंत आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. स्टोक्सने शेवटपर्यंत 52 धावांची खेळी करत संघाला 12 वर्षांनंतर विश्वविजेता बनवला.

2016 च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला होतो. या पराभवासाठी बेन स्टोक्स जबाबदार होता, कारण 20 व्या षटकात गोलंदाजी करताना बेन स्टोक्सने 24 धावा दिल्या होत्या, त्यामुळे इंग्लंडने तो सामना गमावला होता. पण आज अंतिम सामन्यात संघ अडकला आणि बेन स्टोक्सने शानदार खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे इंग्लंड 12 वर्षांनंतर दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषक जिंकला.


हेही वाचाः कोल्हापुरातून कोकणात जाताना मृत्यूचा सापळा, गगनबावडा-करुळ घाटाची दुरवस्था