युवा खेळाडूने इंग्लंडच्या ‘या’ अनुभवी खेळाडूला बाद करत केले स्वप्न पूर्ण; व्हिडीओ व्हायरल

एका अनुभवी खेळाडूला त्रिफळाचीत (Bold) करणे, असे अनेक युवा खेळाडूंचे स्वप्न असते. यासाठी अनुभवी खेळाडूंसोबत खेळताना सातत्याने युवा खेळाडू प्रयत्न करत असतात. मात्र, सरावात कमी पडल्याने त्यांचे हे स्वप्न पुर्ण होत नाही. परंतु, इंग्लंडच्या (England) एका युवा खेळाडूने त्याचे हे स्वप्न पुर्ण केले आहे.

एका अनुभवी खेळाडूला त्रिफळाचीत (Bold) करणे, असे अनेक युवा खेळाडूंचे स्वप्न असते. यासाठी अनुभवी खेळाडूंसोबत खेळताना सातत्याने युवा खेळाडू प्रयत्न करत असतात. मात्र, सरावात कमी पडल्याने त्यांचे हे स्वप्न पुर्ण होत नाही. परंतु, इंग्लंडच्या (England) एका युवा खेळाडूने त्याचे हे स्वप्न पुर्ण केले आहे. स्केल्टन असे या युवा गोलंदाजाचे नाव आहे. स्केल्टनने इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकला (Former England captain Alastair Cook) त्रिफळाचीत केले आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

एका स्थानिक राजकारणी आणि साहित्यिकाने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये तरुण गोलंदाजाने माजी कर्णधार अॅलिस्टर कूकला बाद केल्याचे दिसते. मिळालेल्या माहितीनुसार, या स्थानिक सामन्यात कुक बेडफोरशायर यंग फार्मर्सकडून खेळत होता.

हेही वाचा – Ben Stokes : बेन स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार, ECB ने केली घोषणा

बेडफोरशायर यंग फार्मर्स आणि पॉटन टाऊन क्रिकेट क्लब यांच्यात हा सामना झाला. अॅलिस्टर कुकच्या संघाने 12 षटकात 7 गडी गमावून 128 धावा केल्या. त्याचवेळी कुकला बाद करणाऱ्या युवा गोलंदाजाने 37 धावांत 4 बळी घेतले. अॅलिस्टर कुकने बाद होण्यापूर्वी 20 धावा केल्या. बेडफोरशायर यंग फार्मर्स संघाने हा सामना 26 धावांनी जिंकला.

हेही वाचा – इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया घोषणा

इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण इंग्लंडच्या काऊंटी सामन्यांव्यतिरिक्त स्थानिक सामन्यांमध्ये तो खूप धावा करत आहे. शिवाय, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने आपल्या पहिल्या आणि शेवटच्या कसोटीत शतक झळकावले. सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड यांच्यानंतर अॅलिस्टर कुक कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. अॅलिस्टर कुकने आपल्या कारकिर्दीत 161 कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्याने 12472 धावा केल्या. तसेच सरासरी 45.35 होती. याशिवाय त्याने 33 शतके झळकावली.

कूकने दीर्घकाळ इंग्लंड कसोटी संघाचे नेतृत्व केले. कुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2012-13 साली भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकली होती. यापूर्वी 1984-85 मध्ये इंग्लंडने भारतीय भूमीवर विजय मिळवला होता. त्या मालिकेत कुकने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्या मालिकेत त्याने 562 धावा केल्या होत्या. याशिवाय इंग्लंडचा संघ कुकच्या नेतृत्वाखाली 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, पण भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.


हेही वाचा – Viral video : पंजाबचा संघ प्ले ऑफमध्ये न गेल्याने धवनला वडिलांकडून मारहाण