घरक्रीडाIND vs ENG : बेन स्टोक्सने केले असे काही की पंचांना द्यावी...

IND vs ENG : बेन स्टोक्सने केले असे काही की पंचांना द्यावी लागली ताकीद!

Subscribe

पहिला दिवस इंग्लंडसाठी विसरण्याजोगा ठरला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाईट कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात झाली. हा कसोटी सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्याचा पहिला दिवस इंग्लंडसाठी विसरण्याजोगा ठरला. डावखुरा वेगवान गोलंदाज अक्षर पटेल आणि ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांना मात्र फारसे यश मिळाले नाही. त्यातच इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स इंग्लंडची गोलंदाजी सुरु असताना चेंडूवर थुंकी लावताना दिसला. त्यामुळे पंच नितीन मेनन यांना त्याच्याशी चर्चा करणे भाग पडले.

पंच मेनन यांनी केली चर्चा 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) नियमांमध्ये काही बदल केले असून चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीच्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र, असे असतानाही भारताच्या डावातील १२ व्या षटकात चेंडूला तकाकी आणण्यासाठी स्टोक्स त्यावर थुंकी लावताना दिसला. त्यामुळे पंच नितीन मेनन यांनी त्याच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर चेंडू सॅनिटाईझ केला गेला.

- Advertisement -

दोनदा ताकीद दिली जाते

आयसीसीच्या नियमांनुसार, चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीचा वापर केल्यास संघाला प्रत्येक डावात दोनदा ताकीद दिली जाते. त्यानंतर या संघाने तिसऱ्यांदा हे कृत्य केल्यास दंड म्हणून फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ धावा दिल्या जातात. तसेच थुंकीचा वापर झाल्यास पुन्हा खेळ सुरु होण्याआधी चेंडू सॅनिटाईझ करणे अनिवार्य आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -