घरक्रीडाइंग्लंडच्या 'या' खेळाडूची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

Subscribe

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने जरी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो एकदिवसीय आणि टी-२० मध्ये खेळणार आहे. मोईन अलीने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. अष्टपैलू अलीने २८.२९ च्या सरासरीने २९१४ धावा केल्या आहेत. तर ३६.६६ च्या सरासरीने १९५ विकेट घेतले आहेत.

अलीने सोमवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्ती जाहीर करताना अली म्हणाला, मी आता ३४ वर्षांचा आहे आणि मला शक्य असेल तोपर्यंत खेळायचे आहे आणि मला फक्त माझ्या क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. तसेच, मी कसोटी क्रिकेटचा आनंद घेतला असून मी समाधानी आहे, असे देखील मोईन अली म्हणाला. दरम्यान, मोईन अली निवृत्त झाल्यानंतर इंग्लंडला त्याची उणीव भासणार आहे.

- Advertisement -

मोईन अलीने एक फिरकीपटू म्हणून २०१७ ते २०१९ दरम्यान सर्वोत्तम कामगिरी केली आहे. २०१७ मध्ये, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १५.६४ च्या सरासरीने २६ विकेट घेतल्या होत्या. या मालिकेत ओव्हलवर हॅटट्रिक देखील घेतली होती. त्यानंतर वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यात सहा कसोटींमध्ये ३२ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने कसोटीमध्ये एकदा १० तर ५ वेळा ५ बळी घेण्याची कामगिरीही केली आहे.

मोईन अलीने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी केली आहे. कसोटीमध्ये त्याने पाच शतके झळकावली आहेत. यापैकी चार शतके तर त्याने २०१६ मध्ये झळकावली. आतापर्यंत त्याने ६४ कसोटी सामन्यांमध्ये २९१४ धावा केल्या असून १९५ बळी घेतले आहेत. त्याने कसोटीमध्ये १४ अर्धशतकेही झळकावली आहे.

- Advertisement -

अलीची कसोटी कारकीर्द

फलंदाजी

सामने – ६४
इनिंग्ज – १११
धावा – २९१४
सर्वोच्च धावसंख्या – १५५ नाबाद

गोलंदाजी

सामने – ६४
इनिंग्ज – ११२
विकेट्स – १९५
बेस्ट – ५३-६

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -