इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूचा ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ पुरस्काराने गौरव

इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अली (Moeen Ali) याला 'ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (Order of the British Empire) या पुरस्काराने गौरवण्यत आले आहे.

इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अली (Moeen Ali) याला ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ (Order of the British Empire) या पुरस्काराने गौरवण्यत आले आहे. इंग्लंडसाठी क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल मोईन अलीला ऑर्डर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. क्वीन्स बर्थडे ऑनर्समध्ये त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडच्या संघासाठी क्रिकेटमध्ये योगदान दिल्याबद्दल मोईन अलीला ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्विकारल्यानंतर मोईन अली म्हणाला. “हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. माझ्या आई-वडिलांना माझा अभिमान वाटतो. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. माझ्या चाहत्यांकडून मला नेहमीच प्रोत्साहन मिळायचे. त्यामुळे मी माझ्या फलंदाजीत ही सुधारणा केली”, असे तो म्हणाला.

इंग्लंडसाठी तिन्ही फॉरमेटमध्ये खेळला

फिरकीपटू मोईन अली दिर्घकाळ इंग्लंडसाठी तिन्ही फॉरमेटमध्ये खेळला आहे. दरम्यान, मोईन अलीनं गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन केवळ मर्यादीत षटकाच्या फॉरमेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे संकेतही दिले होते.

दरम्यान, इंडियन प्रिमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्ज संघात मोईन अली खेळत आहे. मोईन अली मधल्या फळीत खेळत असून, त्याला आपल्या तुफानी खेळीच्या जोरावर त्याने चेन्नई सुपर किंग्जला अनेक सामने जिंकून दिले आहेत.

२०१४ साली श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये मोईन अलीने पदार्पण केले होते. मोईनने ६४ कसोटीत ५ शतक आणि १४ अर्धशतकांसह २ हजार ९१४ धावा केल्या आहेत. तसेच, गोलंदाजीत त्याने १९५ विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्यानं १३ वेळा चार आणि ५ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. तर एका कसोटीत १० विकेट्स घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.


हेही वाचा – 6,6,6,6,6,6,… ‘या’ खेळाडूने एकाच षटकात ठोकले सहा षटकार; व्हिडीओ पाहून होईल युवराज सिंहची आठवण