घरक्रीडाWomen's World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत इंग्लंडची अंतिम फेरीत धडक,...

Women’s World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत इंग्लंडची अंतिम फेरीत धडक, या संघाशी होणार सामना

Subscribe

महिला विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १३७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे आता इंग्लंडचा सामना अंतिम फेरीत धडक मारलेल्या ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड संघाने ५० ओव्हर्समध्ये आठ गडी गमावत २९३ धावा केल्या. इंग्लंडकडून सलामीवीर डॅनियल वॉटने १२५ धावांची उत्तम फलंदाजी केली आहे. मात्र, २९३ धावांचं लक्ष पूर्ण करण्यास दक्षिण आफ्रिकेला अपयश आलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ १५६ धावांमध्येच गारद झाला.

इंग्लंडकडून सोफी अॅलेक्सटनने उत्कृष्ट गोलंदाजी करत ६ गडी बाद केले. न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च येथील हेगले ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार सुने लुसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंड संघाला पहिला धक्का १० धावांच्या स्कोअरवर बसला.

- Advertisement -

इंग्लंडचा सलामीवीर आणि स्टार फलंदाज टेमी ब्यूमोंट अवघ्या ७ धावा करून बाद झाला. डॅनियल वॉटने १२५ बॉल्समध्ये १२ चौकारांच्या मदतीने १२९ धावांची खेळी केली. कर्णधार हीथर नाईट १ धाव करून माघारी परतली. टेमी ब्यूमोंटशिवाय सोफिया डंकलेनेही ६० धावा केल्या.

दरम्यान, वेस्ट इंडिचा पराभव करत ऑस्ट्रेलिया संघानं महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियानं १५७ धावांनी वेस्ट इंडिजचा पराभव केला. महिला विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचा हा सलग आठवा विजय आहे. महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने नवव्यांदा प्रवेश केला. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत इंग्लंडने अंतिम फेरीत धडक घेतली आहे. त्यामुळे आता इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Womens World Cup 2022: वेस्ट इंडिजचा पराभव; सलग नवव्यांच्या ऑस्ट्रेलियाची अंतिम फेरीत धडक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -