घरक्रीडाENG vs NZ : इंग्लंडचा गोलंदाज जुन्या वादग्रस्त ट्विटमुळे अडचणीत; दुसऱ्या कसोटीत...

ENG vs NZ : इंग्लंडचा गोलंदाज जुन्या वादग्रस्त ट्विटमुळे अडचणीत; दुसऱ्या कसोटीत होणार संघाबाहेर?

Subscribe

रॉबिन्सनने पदार्पणातच पहिल्या डावात ७५ धावांत ४ विकेट घेतल्या.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या लॉर्ड्सवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनला पदार्पणाची संधी दिली आणि त्याने या संधीचा चांगला उपयोग करत पहिल्या डावात न्यूझीलंडच्या चार विकेट घेतल्या. परंतु, या चांगल्या कामगिरीनंतरही रॉबिन्सनला दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघातून वगळण्यात येण्याची शक्यता आहे. रॉबिन्सनने २०१२ मध्ये काही वर्णभेदी आणि लिंगभेदी ट्विट केले होते. त्याने कसोटीत पदार्पण केल्यानंतर त्याची जुनी ट्विट्स सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे रॉबिन्सनला माफी मागणे भाग पडले. परंतु, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) त्याच्या जुन्या ट्विटची दखल घेतली असून त्याला न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघाबाहेर बसावे लागू शकेल.

माझ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट

आज माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठा दिवस आहे. मात्र, त्याच दिवशी मी आठ वर्षांपूर्वी केलेली वर्णभेदी आणि लिंगभेदी ट्विट्स आता लोकांसमोर येणे ही माझ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, वर्णभेद आणि लिंगभेद याचे मी कधीही समर्थन करणार नाही. मी केलेल्या चुकीची मला कल्पना आहे. माझ्या कृतीमुळे ज्या कोणाला वाईट वाटले असेल त्यांची आणि माझ्या संघातील सहकाऱ्यांची मी माफी मागतो, असे रॉबिन्सन न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर म्हणाला होता.

- Advertisement -

सोशल मीडिया अकाऊंट आधीच तपासून घ्या

रॉबिन्सनने पदार्पणातच पहिल्या डावात ७५ धावांत ४ विकेट घेतल्या. मात्र, १० जूनपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी त्याला इंग्लंड संघातून वगळण्यात येऊ शकेल, असे इंग्लंडमधील डेली टेलिग्राफ या वृत्तपत्राचे म्हणणे आहे. या सर्व प्रकरणाची ईसीबी चौकशी करत आहे. तसेच ईसीबीने भविष्यात इंग्लंडकडून खेळणाऱ्या खेळाडूंचे सोशल मीडिया अकाऊंट आधीच तपासून घेतले पाहिजे, असे मत इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांनी व्यक्त केले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -