घरक्रीडाPak Vs Eng : न्यूझीलंडसह इंग्लंडचाही पाकिस्तान दौरा रद्द, पीसीबीची आगपाखड

Pak Vs Eng : न्यूझीलंडसह इंग्लंडचाही पाकिस्तान दौरा रद्द, पीसीबीची आगपाखड

Subscribe

न्यूझीलंडच्या संघाने सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानचा दौरा रद्द केला. पण याचा परिणाम हा इतर मालिकांवरही झाला आहे. न्यूझीलंड संघाने सामना सुरू होण्याआधी मालिका रद्द करण्याचा निर्णय घेत मायदेशी परतला. पण न्यूझीलंड पाठोपाठच आता इंग्लंडनेही पाकिस्तानचा दौरा रद् केला आहे. या मालिकेमुळेच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडूनची आगपाखड झालेली पहायला मिळत आहे. इंग्लंडला पाकिस्तान दौऱ्यात ऑक्टोबर महिन्यात दोन टी २० सामने खेळायचे होते. तसेच इंग्लंडचा महिला संघदेखील पाकिस्तान दौऱ्यावर येणार होता. पण दोन्ही संघांनी पाकिस्तान दौऱ्यावर येण्याचे टाळत हा दौरा रद्द केला आहे. पण हा दौरा रद्द झाल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्टाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रमीज राजा यांना राग अनावर झाला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून या निर्णयाविरोधात रमीज राजा यांनी एक ट्विट करत निराशा व्यक्त केली आहे.

ईसीबीच्या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रमीझ राजा यांची झालेली आगपाखड दिसून आली आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना जबाबदार ठरवत मालिका रद्द झाल्यासाठी जबाबदार ठरवले आहे. इंग्लंड संघाने आपल्या निर्णयामुळे क्रिकेटच्या अनुषंगाने निराशा केली आहे. तसेच क्रिकेट खेळणाऱ्या एका राष्ट्राची घोर निराशा केली आहे, असेही त्यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे. हे सगळ तेव्हा घडतय जेव्हा पाकिस्तानला या गोष्टीची सर्वाधिक गरज होती. पण आम्ही आमचे अस्तित्व टिकवण्यात यशस्वी होऊ असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाकिस्तान संघाला हीच वेळे झोपेतून जागे होण्यासाठीची आहे. तसेच संघाला पुढे मार्गक्रमण करण्यासाठीची हीच ती वेळ आहे. आता प्रतिमा सुधारली तरच येत्या काळात पाकिस्तान संघासोबत क्रिकेट खेळताना इतर देश कारण पुढे करणार नाही असेही त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून ट्विट करत पोस्ट केली आहे.

- Advertisement -

पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी इंग्लंडच्या खेळांडूंना मालिका रद्द होण्यासाठी दोषी ठरवत खेळांडूंवरच निशाणा साधला आहे. जेव्हा पाकिस्तान सुपर लिगमध्ये खेळायचे असते तेव्हा पाकिस्तानात खेळाडू आनंदाने येतात. पण संघ म्हणून जेव्हा खेळाडू दौऱ्यासाठी येतात तेव्हा खेळाडूंना भीती वाटू लागते.

पाश्चिमात्य देश एकमेकांना साथ देतात. त्यामुळे न्यूझीलंडच्या निर्णयापाठोपाठ पाकिस्तानकडूनही अशाच प्रकारचा निर्णय अपेक्षित होता. सुरक्षेचा कारण देत तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकता. न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानातून बाहेर पडतो, त्यानंतर सुरक्षेचे कारण देतो. आमच्या सुरक्षा यंत्रणांवर अविश्वास ठेवत संघ थेट निघून गेले. त्यानंतर आम्हाला माहिती दिल्यानेच मोठा धक्का बसला.

- Advertisement -

पाकिस्तानात क्रिकेट थांबणार नाही

इतक्या सगळ्या घटनांनंतरही पाकिस्तानात क्रिकेट थांबणार नाही. न्यूझीलंडनंतर इंग्लंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर येऊ शकत नाही. त्याचाच विपरीत परिणाम घडू शकतो. या घटनांमुळे वेस्ट इंडिजच्या सिरीजवरही परिणाम होऊ शकतो. त्यापाठोपाठच पाकिस्तान दौऱ्यावर येणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघानेही दौऱ्यासाठी टाळाटाळ करायला सुरूवात केली आहे. हे सगळे एकाच ब्लॉकचे सदस्या आहेत. त्यामुळे आता तक्रार करायला वाव नाही. अनेकदा खेळाडू सुरक्षेचे कारण देतात तर कधी मानसिक थकव्याचे कारण देतात.

टी २० वर्ल्ड कपच्या आधी होणार होते दोन टी २० मॅचेस

इंग्लंडची टीम १६ वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यासाठी येणार होती. आगामी टी २० वर्ल्ड कप स्पर्धेआधी पहिल्या दोन टी २० सामने रावळपिंडीत खेळले जाणार होते. येत्या १३ आणि १४ ऑक्टोबरला हे सामने होणार होते. त्यासोबतच इंग्लंडचा महिला संघ १७ ऑक्टोबर, १९ ऑक्टोबर आणि २१ ऑक्टोबरला पाकिस्तान दौऱ्यावर येणार होता. इंग्लंडच्या महिला संघाचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा होता.

भारतासोबतच इंग्लंड, न्यूझीलंड संघाचे आव्हान

पाकिस्तानी संघाने आणि फॅन्सने येत्या टी २० वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्ताने आपला राग काढणे अपेक्षित आहे. येत्या स्पर्धेत शेजारील राष्ट्र असलेला भारत हा प्रतिस्पर्धी असेलच. पण भारतासोबतच न्यूझीलंड आणि इंग्लंडचेही आव्हान असणार आहे. या दोन्ही संघाने दौरा रद्द करून पाकिस्तानसोबत चांगले नाही केले. त्यामुळे याचा बदला आम्ही येणाऱ्या सामन्यांमध्ये घेऊ असेही राजा यांनी स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -