Eco friendly bappa Competition
घर क्रीडा इंग्लंड संघाचा पाकिस्तान दौरा; सुरक्षेसाठी हेलिकॉप्टरमधून देखरेख, दुकाने, कार्यालये बंद

इंग्लंड संघाचा पाकिस्तान दौरा; सुरक्षेसाठी हेलिकॉप्टरमधून देखरेख, दुकाने, कार्यालये बंद

Subscribe

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी इंग्लंडचा संघ पाकिस्तानात दाखल झाला आहे. इंग्लंडचा पाकिस्तान दौरा असून, पाकिस्तानात दाखल झाल्यानंतर इंग्लंडच्या संघासाठी पाकिस्तानने तगडा बंदोबस्त ठेवला आहे. इंग्लंडचा हा तब्बल 17 वर्षानंतर पहिला पाकिस्तान दौरा आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी इंग्लंडचा संघ पाकिस्तानात दाखल झाला आहे. इंग्लंडचा पाकिस्तान दौरा असून, पाकिस्तानात दाखल झाल्यानंतर इंग्लंडच्या संघासाठी पाकिस्तानने तगडा बंदोबस्त ठेवला आहे. इंग्लंडचा हा तब्बल 17 वर्षानंतर पहिला पाकिस्तान दौरा आहे. यापूर्वी इंग्लंडचा क्रिकेट संघ पाकिस्तानात सुरक्षेच्या कारणास्तव खेळण्यास नकार देत होता. (England Cricket Team In Pakistan Tight Security Arrangement for players)

पाकिस्तान दौऱ्यात 7 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर डिसेंबरमध्ये 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड पुन्हा एकदा पाकिस्तानात येणार आहे. इंग्लंडचा क्रिकेट संघ आज पाकिस्तानातील कराचीत दाखल झाला आहे.

- Advertisement -

सामन्याच्या दिवशी इंग्लंडचा संघ हॉटेलपासून कराची नॅशनल स्टेडियमकडे ज्या रस्त्यावरून जाणार आहे. त्या रस्त्यावर नाकाबंदी केली जाणार आहे. तसेच त्यावर सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तैनात केले जाणार आहे. शिवाय, इंग्लंड संघाच्या प्रवासादरम्यान, हेलिकॉप्टरद्वारे देखरेख करण्यात येणार आहे. ज्या मार्गावरून इंग्लंडचा संघ जाणार आहे त्या मार्गावरील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

इंग्लंडने 2005 ला शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी इंग्लंड पाकिस्तानचा दौरा करणार होते. मात्र, न्यूझीलंडने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौऱ्या अर्ध्यावर सोडला होता. त्यानंतर इंग्लंडने देखील आयत्यावेळी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली होती.


- Advertisement -

हेही वाचा – पाकिस्तानचे पंच असद रऊफ यांचे निधन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -