The Ashes 2021: इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौरा करणार, पण…

Ashehsh australia 2021

इंग्लंडचा पुरूष संघ अखेर आगामी अॅशेश मालिकेसाठी अखेर ऑस्ट्रेलिया दौरा करण्यासाठी तयार झाला आहे. जो रूटच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौरा करेल, अशी माहिती युकेच्या डेली टेलिग्राफने दिले आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोलताना आपले कोविड प्रोटोकॉलशी संबंधित आपली काळजी बोलून दाखवली. या आठवड्याच्या अखेरीपर्यंत इंग्लंडच्या खेळाडूंना याबाबतचा निर्णय घेण्यासाठीचा वेळ देण्यात आला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (ECB) कडून मुख्य खेळाडूंच्या उपस्थितीत अॅशेशसाठी इंग्लंड दौरा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

कोणते खेळाडू दौरा मुकणार ?

इंग्लंडच्या क्रिकेट संघातील यष्टीरक्षक जॉस बटलरचा अपवाद सोडला तर इंग्लंडचे इतर खेळाडू हे दौऱ्यासाठी तयार आहेत. जॉस बटलरने या दौऱ्यातील कालावधी आणि कुटूंबासाठी द्यावा लागणारा वेळ याबाबतची चिंता याआधीच बोलून दाखवली आहे. अॅशेश मालिकेसाठी आता मोईन अलीही खेळणार नाही, कारण त्याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर बेन स्टोक्सने या दौऱ्यात विश्रांती घेतली आहे. तसेच जोफ्रा आर्चरने दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण इंग्लंड संघ दौरा करण्यासाठी तयार होणे हा मोठा दिलासा मानला जात आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी स्पष्ट केले की, ऑस्ट्रेलियातील परिस्थितीत आता सुधारणा होत आहे. ऑस्ट्रेलियात लसीकरणाचा दरही वाढतो आहे. इंग्लंडच्या संघासोबतही दोन वेगवेगळ्या बैठका झाल्या आहेत. त्यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या कुटूंबांच्या क्वारंटाईन कालावधीवर चर्चा झाली आहे. इंग्लंडच्या टीमच्या खेळाडूंचे कुटूंबीय हे ख्रिसमसच्या आधीच मेलबर्नमध्ये क्वारंटाईनसाठी येणार असल्याचे कळते.

इंग्लंडच्या खेळाडूंना चिंता आहे की, खेळाडूंच्या कुटूंबीयांना इंग्लंड दौऱ्यासाठी येण्यासाठी क्वारंटाईनच्या नियमावलीनुसार नोव्हेंबर उजाडू शकतो. दीर्घकाळ असणाऱ्या दौऱ्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंनी ही चिंता बोलून दाखवली आहे.


हेही वाचा – IPL 2021 : धोनीची सर्वात मोठी फॅन ; CSK साठी प्रार्थना करणाऱ्या झिवाचा फोटो व्हायरल