घरक्रीडाभारतीयांना चिडवणे पडणार महागात? जुन्या ट्विटमुळे बटलर, मॉर्गनवर कारवाईची शक्यता

भारतीयांना चिडवणे पडणार महागात? जुन्या ट्विटमुळे बटलर, मॉर्गनवर कारवाईची शक्यता

Subscribe

या दोघांनी केलेल्या ट्विटचे स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहे.

जुनी काही वादग्रस्त, वर्णभेदी किंवा दुसऱ्याला चिडवत केलेली ट्विट्स आता इंग्लंड क्रिकेटपटूंसाठी महागात पडताना दिसत आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याची काही जुनी वर्णभेदी आणि लिंगभेदी ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले आहे. त्यापाठोपाठ आता इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि उपकर्णधार जॉस बटलर हेसुद्धा त्यांच्या जुन्या ट्विटमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत मॉर्गन कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करतो, तर बटलर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो. या दोघांनी २०१७ आणि २०१८ मध्ये भारतीयांना चिडवणारे ट्विट केले होते. इंग्लंडमधील टेलिग्राफ वृत्तपत्रातील माहितीनुसार, या दोघांनी केलेल्या ट्विटचे स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहे. भारतीय चाहते परदेशी क्रिकेटपटूंना सोशल मीडियावर मेसेज करत असतात. त्यांची स्तुती करत असतात. त्यावेळी या क्रिकेटपटूंना आदर देण्यासाठी म्हणून भारतीय चाहते ‘सर’ असे संबोधतात.

- Advertisement -

ईसीबीने घेतली दखल  

भारतीय चाहत्यांना चिडवण्यासाठी म्हणून बटलरने आपल्या एका ट्विटमध्ये सर हा शब्द वापरला होता. त्यानंतर मॉर्गननेही एक ट्विट केले, ज्यात त्याने बटलरचाही समावेश केला होता. ‘सर, तुम्ही माझे सर्वात आवडते फलंदाज आहेत,’ असे मॉर्गन या ट्विटमध्ये म्हणाला. या दोघांनी पुढे जाऊन हे ट्विट डिलीट केले. परंतु, ईसीबीने त्यांच्या या ट्विटची आता दखल घेतली असून या दोघांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -