Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा ENG VS IND 5TH TEST : पाचव्या कसोटीत इंग्लंड विजयी घोषित

ENG VS IND 5TH TEST : पाचव्या कसोटीत इंग्लंड विजयी घोषित

Related Story

- Advertisement -

इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात असताना. जिथे मालिका शेवटच्या घटकावर होती तेथे बीसीसीआय आणि ईसीबीच्या अधिकाऱ्यांनी पाचव्या कसोटीसंदर्भात सविस्तर चर्चा करुन सर्व शक्यता पडताळून पाहिल्या. दोन्हीकडील अधिकाऱ्यांमध्ये सामन्याच्या आयोजनासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर सामन्याला अगदी काही तास शिल्लक असताना केलेल्या चर्चेनंतर करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो या भीतीने सामना रद्द करण्यात आलाय. यासाठी दोन्ही क्रिकेट मंडळांकडून क्रिकेट चाहते आणि सामन्याशी संबंधित इतर सहकाऱ्यांची माफीही मागण्यात आलीय. भारतीय संघामधील सदस्य करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने करोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती असल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे असं ईसीबीने स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांच्यानंतर परमार यांना करोनाची लागण झाल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारचे सराव सत्र रद्द करावे लागले. संघामधील सर्व खेळाडूंच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या. सावधगिरी म्हणून भारतीय चमूला आपापल्या खोलीत थांबण्याचे निर्देश देण्यात आले होते. शास्त्री यांच्या संपर्कातील भारताचे मुख्य फिजिओ नितीन पटेल सध्या विलगीकरणात असल्यामुळे पाचव्या कसोटीस संघासोबत फिजिओ नसेल. क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधरसुद्धा विलगीकरणात असून, फक्त फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड संघासोबत आहेत

इंग्लंड करतोय विजयाची मागणी

रवी शास्त्री, अरुण आणि योगेश परमार यांना करोनाची लागण झाल्याने भारताचे सर्व खेळाडू सध्या विलगीकरणात आहेत. त्यामुळे भारताने जोखीम पत्करून कसोटी खेळण्याऐवजी इंग्लंडला विजय बहाल करावा, अशी मागणी ‘ईसीबी’च्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचं सांगण्यात येतं. मात्र कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माने मागनी फेटाळून लावल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय, २०२२ मधील मर्यादित षटकांच्या मालिकेवर याचे विपरित परिणाम होतील, असेही भारतीय संघ व्यवस्थापनाने ‘ईसीबी’ला कळवल्याचे समजते. पाचवी कसोटी रद्द झाली, तर भारत २-१ अशा फरकाने मालिका जिंकेल. मात्र भारताने स्वत:हून पराभव मान्य केल्यास इंग्लंड मालिकेत २-२ अशी बरोबरी साधेल आणि पतौडी करंडक त्यांच्याकडेच कायम राखला जाईल.


- Advertisement -

हेही वाचा : ENG VS IND 5TH TEST : भारत आणि इंग्लंड दरम्यानची कसोटी अखेर रद्द, ECB ची घोषणा

- Advertisement -