घरक्रीडाT20 world cup 2021 : ENG vs BAN इंग्लंडने ८ गडी राखून...

T20 world cup 2021 : ENG vs BAN इंग्लंडने ८ गडी राखून सामन्यावर गाजवले वर्चस्व

Subscribe

इंग्लंडने बांगलादेशचा 8 गडी राखून पराभव केला

टी २० विश्वचषकातील इंग्लंड आणि बाग्लांदेश मधील सामन्यात इंग्लंडने बांग्लादेशचा ८ गडी राखून दारूण पराभव केला. सोबतच इंग्लडने विश्वचषकातील आपल्या दुसरा सामन्यात देखील विजय मिळवला. आणि ग्रुप ए मध्ये ४ अंकासह पहिल्या स्थानावर मजल मारली. सामन्यात इंंग्लंडच्या गोलंदाजांचे वर्चस्व पहायला मिळाले. बांग्लादेशचे पहिल्या १० षटकांत ३ गडी बाद झाले होते. मुशफिकुर रहिमान वगळता कोणत्याच बांग्लादेशी फलंदाजाला २० पेक्षा जास्त धावसंख्या उभारता आली नाही.

टी २० विश्वचषकाच्या सुपर १२ व्या फेरीसाठी बांग्लादेश आणि इग्लंड यांच्यात रोमांचक लढत पहायला मिळाली. बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशने ९ बाद १२४ अशी तुरळक धावसंख्या उभारली. इंग्लंडच्या सलामीवीरांच्या ५० धावांच्या अर्धशतकीय भागीदारीच्या बदल्यात इग्लंडने सामन्यावर सहज विजय मिळवला. जेसन रॉयची ६१ धावांची खेळी सामन्याच्या निकालात निर्णायक ठरली.

- Advertisement -

सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजाचे वर्चस्व

इंग्लंडच्या आक्रमक गोलंदाजीसमोर बांग्लादेशचे सर्वच गोलंदाज चितपट झाल्याचे पहायला मिळाले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी पहिल्या १० षटकांत बांग्लादेशचे ३ फलंदाज माघारी पाठवले. मोईन अलीने सलग २ चेंडूवर २ गडी बाद केले, मोईन अलीने प्रतिस्पर्धी संघावर दबाव राखून ठेवला. ख्रिस व्होक्सच्या गोलंदाजीवर अदिल राशीदने त्याचा झेल घेतला. संघाची अवस्था बिकट असताना मुशफिकुर आणि महमुद्दुल्लाह यांनी डाव सावरला. मात्र दोघांना मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आले. मुशफिकुर रहिम २९ धावांवर असताना लिविंगस्टोनने त्याला बाद केले.

इग्लंडचा आजचा संघ

जेसन रॉय, जॉस बटलर, डेविड मालान, जॉनी बेअरस्टो, लियाम लिविंगस्टोन, इओन मॉर्गन, मोइन अली, ख्रिस व्होक्स, ख्रिस जॉर्डन, अदिल राशीद, टायमल मिल्स

- Advertisement -

बांग्लादेशचा आजचा संघ

मोहम्मद नईम, लिटॉन दास, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहिम, महमुद्दुल्लाह, अफिफ होसैन, नुरूल हसन, महेदी हसन, नसुम अहमद, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -