घरक्रीडाIND vs ENG : दुसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडचा संघ चिंतेत; 'या' प्रमुख गोलंदाजाला...

IND vs ENG : दुसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडचा संघ चिंतेत; ‘या’ प्रमुख गोलंदाजाला दुखापत

Subscribe

दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून खेळला जाणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. हा सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. परंतु, या सामन्यापूर्वीच इंग्लंडचा संघ चिंतेत आहे. याचे कारण म्हणजे, इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. उजव्या पायाला दुखापत झाल्यामुळे ब्रॉडला सरावातून माघार घेणे भाग पडले. त्यामुळे दुसऱ्या कसोटीतील त्याच्या सहभागाबाबत साशंकता आहे. ‘लॉर्ड्सवर सरावादरम्यान स्टुअर्ट ब्रॉडच्या उजव्या पायाला दुखापत झाली आणि त्याला संघातील इतर खेळाडूंसोबत सराव करता आला नाही,’ असे सांगण्यात आले.

दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता

ब्रॉड हा इंग्लंडच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत १४९ कसोटी सामन्यांत ५२४ विकेट घेतल्या आहेत. भारताविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दोन डावांत त्याला केवळ एक विकेट घेता आली. तर आता दुखापतीमुळे तो दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या खेळाडूंचा याआधीच दुखापतींनी पिच्छा पुरवला आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला दुखापतीमुळे यावर्षी क्रिकेट खेळता येणार नाही. तसेच अष्टपैलू बेन स्टोक्सने मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

साकिब महमूद संघात

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. तर दुसरा सामना गुरुवारपासून खेळला जाणार आहे. या सामन्यात ब्रॉड खेळू न शकल्यास इंग्लंडकडे जेम्स अँडरसन, सॅम करन, क्रेग ओव्हरटन, ऑली रॉबिन्सन आणि मार्क वूड या वेगवान गोलंदाजांचा पर्याय आहे. तसेच या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज साकिब महमूदचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -