घरक्रीडाPSL : धोनीचा हेलिकॉप्टर शॉट पोहोचला पाकिस्तानात; इंग्लंडची क्रिकेटपटू म्हणाली 'मलाही शिकव'!

PSL : धोनीचा हेलिकॉप्टर शॉट पोहोचला पाकिस्तानात; इंग्लंडची क्रिकेटपटू म्हणाली ‘मलाही शिकव’!

Subscribe

इतर खेळाडू धोनीकडून प्रेरणा घेत हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न करत असतात.

‘हेलिकॉप्टर शॉट’ हे शब्द उच्चारल्यावर आजही भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आठवण होते. धोनीने अनेकदा उत्कृष्ट गोलंदाजांविरुद्ध हेलिकॉप्टर शॉट मारत चेंडू सीमारेषेबाहेर पोहोचवल्याचे याआधी पाहायला मिळाले आहे. आता धोनी आयपीएल व्यतिरिक्त इतर स्पर्धांमध्ये खेळत नसला तरी इतर खेळाडू धोनीकडून प्रेरणा घेत हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न करत असतात. अफगाणिस्तानचा अष्टपैलू राशिद खानने पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यात धोनीने लोकप्रिय केलेला हा फटका मारला. त्याने मारलेल्या हेलिकॉप्टर शॉटने इंग्लंडची माजी क्रिकेटपटू सारा टेलर प्रभावित झाली. ट्विटरवर राशिदचे कौतुक करताना तिने हा फटका मलाही शिकव असे म्हटले.

- Advertisement -

राशिदने मारला विजयी षटकार

पाकिस्तान सुपर लीगमध्ये रविवारी लाहोर कलंदर आणि पेशावर झल्मी यांच्यात सामना झाला. या सामन्यात पेशावरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १४० अशी धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून रवी बोपाराने अर्धशतकी खेळी केली. तर लाहोरच्या शाहीन आफ्रिदीने ३ विकेट घेतल्या. लाहोरने १४१ धावांचे लक्ष्य १८.३ षटकांत पूर्ण केले. राशिदने १५ चेंडूत नाबाद २७ धावांची खेळी केली. तसेच लाहोरला जिंकण्यासाठी ४ धावांची आवश्यकता असताना राशिदने हेलिकॉप्टर शॉट मारत षटकार लगावला आणि लाहोरला विजय मिळवून दिला. त्याच्या या फटक्याचा व्हिडिओ आयसीसीनेही ट्विट केला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -