Ashes 2021-22 fallout: एॅशेस मालिकेतील खराब कामगिरीनंतर इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा राजीनामा

इंग्लंड क्रिकेटने ऑस्ट्रेलियाविरूद्ध एॅशेस मालिका आणि २०२१ मध्ये खराब कामगिरी केल्यामुळे इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामासंदर्भातील घोषणा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने केली आहे. मात्र, वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या मालिकेनंतर बोर्डाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांनी राजीनामा दिल्यानंतर कसोटी संघाची धुरा कर्णधार जो रूट सांभाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जो रूटबाबत बोर्ड लवकरच निर्णय घेऊ शकतो. एॅशेस मालिकेत इंग्लंडचा ४-० असा पराभव झाला होता. या मालिकेत इंग्लंडचे फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही अपयशी ठरले होते. त्यामुळे २४ तासांपूर्वीच बोर्डाचे मॅनेजिंग डायरेक्टर एश्ले जाईल्स यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

वेस्टइंडिज विरूद्ध होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांसाठी ईसीबीकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये सिल्वरवुडची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच त्यांनी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केलंय. मात्र एॅशेस मालिकेनंतर ख्रिस सिल्व्हरवुड मुख्य प्रशिक्षकाच्या पदावरून पायउतार झाला आहे. तसेच वेस्ट इंडिजच्या आगामी दौऱ्यासाठी लवकरच नव्या प्रशिक्षकाची घोषणा करण्यात येईल, असं ईसीबीने म्हटलंय.

ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसनने सिल्व्हरवुडला एक महान आणि सत्यनिष्ठ व्यक्ती असं म्हटलं आहे. तसेच सर्व क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफला त्यांच्यासोबत काम करताना खूप आनंद झाला. ख्रिसने क्रिकेट आणि सामने जिंकून देण्यासाठी सर्वातपरी प्रयत्न केले आहेत, असं देखील हॅरिसनने म्हटलंय.


हेही वाचा : Nitesh Rane : नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायलयीन कोठडी