टी-20 मध्ये जलद 1000 धावा करणारा ‘हा’ ठरला पहिला भारतीय कर्णधार

पाचव्या आणि निर्णायक कसोटी (Test Match) सामन्यानंतर भारत आणि इग्लंड यांच्यात टी-20 मालिका (T-20 Tournament) सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरूवारी साउथॅम्प्टनच्या (Southampton) द रोज बाउल (The Rose Bowl) स्टेडियमवर खेळण्यात आला.

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम (Record) केला आहे. 1000 हजार धावा पूर्ण करत त्याने माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा विक्रम मोडीत काढला आहे. इंग्लंड (England) विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात रोहित स्वस्त:त बाद झाला. मात्र रोहितने 14 चेंडूत 24 धावा केल्या. याच खेळीच्या जोरावर रोहित शर्मा टी-20 मध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. (england india rohit sharma breaks virat kohli captaincy record of 1000 runs)

पाचव्या आणि निर्णायक कसोटी (Test Match) सामन्यानंतर भारत आणि इग्लंड यांच्यात टी-20 मालिका (T-20 Tournament) सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरूवारी साउथॅम्प्टनच्या (Southampton) द रोज बाउल (The Rose Bowl) स्टेडियमवर खेळण्यात आला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताकडून सलामीसाठी आलेल्या रोहित शर्माने 14 चेंडूत 24 धावा केल्या. ज्यात पाच चौकारांचा समावेश आहे.

हेही वाचा – इंग्लंड विरोधात भारताचा लज्जास्पद पराभव

रोहितने या खेळीच्या जोरावर रनमशीन विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. विराट कोहलीने कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये 30 डावांत 1000 धावांचा टप्पा गाठला होता. मात्र, रोहित शर्माने 29 व्या डावात 1000 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्माने आतापर्यंत 125 टी-20 आतंरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

यामध्ये 3 हजार 313 धावा ठोकल्या आहेत. यावेळी त्याने 4 शतक आणि 26 अर्धशतक झळकावली आहे. त्याची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम धावसंख्या 118 धावा केल्या आहेत. टी-20 फॉरमेटमध्ये त्याने आतापर्यंत 293 चौकार आणि 155 षटकार ठोकले असून 50 झेल घेतल्या आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 50 धावांनी विजय मिळवला आहे. भारताच्या विजयात हार्दिक पांड्यानं मोलाचा वाटा उचलला आहे. त्यानं फलंदाजीसह गोलंदाजीतही दमदार कामगिरी करून दाखवली आहे.

प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या हार्दिक पांड्यानं 29 चेंडूत 51 धावांची खेळी केली. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत इंग्लंजच्या चार फलंदाजाला माघारी धाडलं. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.


हेही वाचा – इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यांत अर्शदीप सिंगचे पदार्पण