घरक्रीडाIND vs ENG : इंग्लंडचा संघ सामना जिंकण्यासाठी खेळत नाहीये; वॉर्नची टीका 

IND vs ENG : इंग्लंडचा संघ सामना जिंकण्यासाठी खेळत नाहीये; वॉर्नची टीका 

Subscribe

इंग्लंडने दुसऱ्या डावात १७८ धावा करण्यासाठी ४६.३ षटके घेतली.

चेन्नई येथे सुरु असलेल्या भारताविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडला २४१ धावांची आघाडी मिळाली. मात्र, असे असतानाही त्यांनी भारताला फॉलोऑन दिला नाही. तसेच त्यांनी दुसऱ्या डावातही बराच काळ फलंदाजी केली. त्यांच्या फलंदाजांनी फारशी आक्रमकता दाखवली नाही. इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावांत आटोपला आणि त्यामुळे भारताला सामना जिंकण्यासाठी ४२० धावांचे आव्हान मिळाले. परंतु, इंग्लंडने दुसऱ्या डावात १७८ धावा करण्यासाठी ४६.३ षटके घेतली. त्यामुळे इंग्लंडने ज्याप्रकारे फलंदाजी केली, ते ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नला फारसे आवडले नाही. ‘इंग्लंडचा संघ कसोटी सामना जिंकण्याच्या नाही, तर न गमावण्याच्या मानसिकतेने खेळत आहे,’ असे मत वॉर्नने व्यक्त केले.

फिरकीपटूंवर खूप दडपण

‘इंग्लंडचा संघ कसोटी सामना न गमावण्याच्या मानसिकतेने खेळत आहे. आपण हा सामना कसा जिंकू शकतो आणि भारताच्या सर्व विकेट घेण्यासाठी आपल्याला किती षटकांची गरज आहे, याचा त्यांनी विचार केला पाहिजे होता. बराच काळ फलंदाजी करण्याच्या इंग्लंडच्या निर्णयामुळे आता त्यांच्या गोलंदाजांवर आणि खासकरून फिरकीपटूंवर झटपट विकेट घेण्यासाठी खूप दडपण येणार आहे,’ असे वॉर्नने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले.

- Advertisement -

इंग्लंडने धोका पत्करणे टाळले

‘ऑस्ट्रेलियामध्ये भारताने निडरपणे खेळ केला. त्यामुळे त्यांचा खेळ पाहताना खूप मजा आली होती. ऑस्ट्रेलियाने मात्र धोका पत्करणे टाळले आणि त्यांनी ती मालिका गमावली. आता इंग्लंडचा संघ धोका पत्करणे टाळत आहे.’ असेही वॉर्न त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाला. इंग्लंडने दिलेल्या ४२० धावांचा पाठलाग करताना भारताची चौथ्या दिवसअखेर १ बाद ३९ अशी धावसंख्या होती.

- Advertisement -

हेही वाचा – रोहित शर्मा स्वस्तात माघारी; भारत १ बाद ३९


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -