घरक्रीडाइंग्लंडला मालिकेत आघाडी

इंग्लंडला मालिकेत आघाडी

Subscribe

दुसर्‍या कसोटीत एक डाव आणि ५३ धावांनी विजयी

केशव महाराज आणि डेन पॅटर्सन या अखेरच्या जोडीच्या झुंजार फलंदाजीनंतरही दक्षिण आफ्रिकेला तिसर्‍या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि ५३ धावांनी जिंकत चार सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली. इंग्लंडच्या पहिल्या डावात नाबाद १३५ धावांची खेळी करणार्‍या ऑली पोपला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

इंग्लंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आपला पहिला डाव ९ बाद ४९९ धावांवर घोषित केला. त्यांच्याकडून बेन स्टोक्स (१२०) आणि पोप यांनी शतके केली. याचे उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या २०९ धावांवर आटोपल्याने त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. इंग्लंडचा ऑफस्पिनर डॉम बेसने ५ गडी बाद केले.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दुसर्‍या डावातही निराशजनक कामगिरी केली. त्यांनी ९ विकेट १३८ धावांतच गमावल्या होत्या. मात्र, महाराज आणि पॅटर्सन या अखेरच्या जोडीने ९९ धावांची भागीदारी रचत इंग्लंडच्या गोलंदाजांना झुंज दिली. महाराजने ९० चेंडूत आपले कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. मात्र, तो ७१ धावांवर धावचीत झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव २३७ धावांवर संपुष्टात आला आणि इंग्लंडने हा सामना जिंकला.

संक्षिप्त धावफलक – इंग्लंड : ९ बाद ४९९ डाव घोषित विजयी वि. दक्षिण आफ्रिका : २०९ आणि २३७ (महाराज ७१, पॅटर्सन नाबाद ३९; रुट ४/८७, वूड ३/३२).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -