Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा त्याला खरेदी करण्यासाठी मी पैसे खर्च करेन, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं बाबर आझमबद्दल...

त्याला खरेदी करण्यासाठी मी पैसे खर्च करेन, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं बाबर आझमबद्दल मोठं विधान

Subscribe

इंग्लंडचा दिग्गज खेळाडू आणि अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याच्याबाबत मोठं विधान केलं आहे. अलीकडेच झालेल्या द हंड्रेडच्या ड्राफ्टमध्ये बाबर आझमला कोणीच खरेदीदार मिळाला नव्हता. त्यामुळे आझमला खरेदी करण्यासाठी मी माझे सर्व पैसे खर्च करेन, असं जेम्स अँडरसनने म्हटले आहे.

द हँड्रेडच्या यंदाच्या हंगामाची सुरूवात येत्या १ ऑगस्टपासून होणार आहे. यासाठी एकूण ६४ महिला आणि पुरुष खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, प्रथमच महिला खेळाडूंचा ड्राफ्ट झाला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या काही नामांकित चेहऱ्यांना या ड्राफ्टमध्ये खरेदीदार मिळाल नाहीये. या ड्राफ्टमध्ये पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम, यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू कायरन पोलार्ड आणि ट्रेन्ट बोल्ट यांसारख्या बड्या खेळाडूंचा समावेश आहे.

- Advertisement -

अँडरसनने बीबीसीच्या पॉटकास्टमध्ये बोलताना म्हटले की, मी बाबर आझमला खरेदी करण्यासाठी दुप्पट पैसे खर्च करेन. मी माझे सर्व बजेट बाबरला खरेदी करण्यासाठी खर्च करेन पण त्याला आपल्या ताफ्यात घेईनच. फक्त तो उपलब्ध नसू शकतो हिच एक समस्या असू शकते. कदाचित म्हणूनच त्याला कोणी खरेदी केले नसावे.

बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर उभारी घेतली आहे. त्यामुळे बाबर आझम एक मोठा सेलिब्रेटी बनत आहे. त्याला द हंड्रेडमध्ये कोणीही खरेदीदार मिळाला नसला तरी पाकिस्तान संघाचे वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ हे द हंड्रेडमध्ये खेळताना दिसणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा : CSK vs GT : ‘जखमी’ धोनी पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी? कोण असेल चेन्नईचा


 

- Advertisment -