Homeक्रीडाIND VS ENG : मोहम्मद शमीचा घातक मारा, भारताने 4-1 ने जिंकली...

IND VS ENG : मोहम्मद शमीचा घातक मारा, भारताने 4-1 ने जिंकली टी-20 मालिका

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज (2 फेब्रुवारी) वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने अवघ्या 37 चेंडूंत वेगवान शतक पूर्ण केले. त्यामुळे इंग्लंडला 248 धावांचे आव्हान मिळाले. मात्र फिल सॉल्म वगळता इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यासह भारातने 150 धावांनी मोठा विजय मिळवत टी-20 मालिका 4-1 ने जिंकली.

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या टी-20 मालिकेतील पुण्यात (31 जानेवारी) खेळवण्यात आलेला चौथा सामना जिंकत भारताने 3-1 ने मालिका आधीच जिंकली होती. यानंतर आज (2 फेब्रुवारी) पाचवा आणि शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने अवघ्या 37 चेंडूंत वेगवान शतक पूर्ण केले. त्यामुळे इंग्लंडला 248 धावांचे आव्हान मिळाले. मात्र फिल सॉल्म वगळता इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यासह भारातने 150 धावांनी मोठा विजय मिळवत टी-20 मालिका 4-1 ने जिंकली. (England lose by 150 runs in fifth T20I after Abhishek Sharma quick century)

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर संजू सॅमसन 16 धावा करून बाद झाला. यानंतर, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 43 चेंडूत 115 धावांची भागीदारी केली. मात्र तिलक वर्मा फक्त 24 धावा करून बाद झाला. मात्र अभिषेक शर्मा एका बाजूने स्फोटक फलंदाजी करताना दिसला. त्याने अवघ्या 17 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर 37 चेंडूंत वेगवान शतक पूर्ण केले. या काळात त्याने 7 चौकार आणि 13 षटकारांचा पाऊस पाडला. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारताकडून वेगवान शतक पूर्ण करणारा अभिषेक शर्मा हा दुसरा फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – Prithviraj Mohol : पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी, गोंधळानंतर महेंद्र गायकवाडने सोडलं मैदान

अभिषेक शर्माशिवाय शिवम दुबेने 30 आणि अक्षर पटेलने 15 धावांची योगदान दिले. त्यामुळे भारताने निर्धारीत 20 षटकात 9 विकेट गमावत 247 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात इंग्लंडची सुरुवात खराब झाली. त्यांचा संपूर्ण संघ फक्त 97 धावांच करू शकला. फिल सॉल्ट वगळता इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला 10 धावांचा टप्पा पार करता आला नाही. फिल सॉल्टने 23 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटाकारांच्या मदतीने 55 धावांची खेळी केली. यासह भारताने 150 धावांनी पाचवा सामना जिंकला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या व रवी बिश्नोईला 1 विकेट मिळाली.

अभिषेक शर्मा वेगवान शतक करणारा दुसरा फलंदाज

दरम्यान, भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 35 चेंडूत शतक ठोकले होते. यानंतर, संजू सॅमसनने 2024 मध्ये बांग्लादेशविरुद्ध 40 चेंडूत शतक ठोकून भारतासाठी दुसरे सर्वात जलद टी-20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकण्याचा मान मिळवला होता. पण आता अभिषेक शर्माने 37 चेंडूत शतक ठोकून संजूला मागे टाकले आहे.

हेही वाचा – U-19 Womens World Cup : भारतीय पोरींची कमाल, दुसऱ्यांदा कोरले विश्वचषकावर नाव