इंग्लंडच्या या खेळाडूचं सीमारेषेवर फलंदाजी करताना आपटलं डोकं; गंभीर दुखापतीमुळे कसोटीतून बाहेर

इंग्लंड (England) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात कसोटी सामना (Test Match) सुरू आहे. या सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीच याचे डोके आपटले. जोराचा मार लागल्याने जॅक लीचला गंभीर दुखापत (Head Injury) झाली आहे.

इंग्लंड (England) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात कसोटी सामना (Test Match) सुरू आहे. या सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीच याचे डोके आपटले. जोराचा मार लागल्याने जॅक लीचला गंभीर दुखापत (Head Injury) झाली आहे. त्यामुळे त्याला पहिल्या लॉर्ड्स कसोटीतून बाहेर जावे लागले आहे. सामन्याच्या सहाव्या षटकात सीमारेषेवर चौकार अडवताना लीच मैदानात डोक्यावर आपटला. त्याच्या जागी आता मार्क पार्किनसन याला संघात स्थान देण्यात आले आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीवेळी इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीच (Jack Leach) सीमारेषेवर चौकार अडवताना चांगलाच मैदानात डोक्यावर आपटला. चेंडू अडवण्यासाठी वेगाने धावत असल्याने त्याला अंदाज न आल्याने त्याचा तोल गेला आणि तो मैदानात डोक्यावर आपटला. त्यानंतर तो डोकं धरून तीथेच झोपला. डोक्याला झालेली दुखापत गंभीर असल्याचे समजतात. पव्हेलियनमध्ये बसलेली इंग्लंड संघाची मेडिकल टीम लिचवर प्रथमोपचार करण्यासाठी मैदानात आली.

पहिल्या कसोटीतून बाहेर

प्रथोमचारादरम्यान, लीचच्या डोक्याला झालेली दुखापत ही खूप गंभीर असल्याने त्याला पहिल्या कसोटीतून बाहेर जावे लागले. त्यामुळे आता लीचच्या जागी मॅट पार्किनसन हा कनकशन सबस्टिट्यूट असणार आहे. लेग स्पिनर मार्क पार्किनसन गुरूवारी मॅनचेस्टरहून लंडनला येऊन संघात सामील होणार असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितले.

हेही वाचा – इंग्लंडच्या ‘या’ माजी कसोटीपटूचे निधन

कनकशन सबस्टिट्यूट

इंग्लंडच्या घोषित केलेल्या १३ सदस्यांच्या संघामध्ये दुसरा कोणताही स्पिनर नव्हता. त्यामुळे कनकशन सबस्टिट्यूटच्या नियमानुसार ज्या प्रकारच्या खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाली असेल, तशाच प्रकारचा खेळाडू कनकशन सबस्टिट्यूट म्हणून मैदानात खेळू शकतो. या कारणासाठी पार्किनसनला संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, पार्किनसनने अजून एकही कसोटी सामना खेळलेला नाही, पण तो मागच्या इंग्लंड संघात खेळला होता. याशिवाय त्याने ९ लिमिटेड ओव्हर सामने खेळला आहे.

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय

लॉर्ड्सवर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांचा संघ १३२ धावांवर ऑल आऊट झाला. जेम्स अंडरसन आणि मॅटी पॉट्स यांना प्रत्येकी ४-४ विकेट मिळाल्या. तर स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्सला ४-४ विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडकडून कॉलिन डि ग्रॅण्डहोमने सर्वाधिक ४२ धावा केल्या.


हेही वाचा – T20 World Cup : माजी खेळाडू आकाश चोप्राने निवडला भारतीय संघ; ‘या’ प्रमुख खेळडूंना वगळले