PAK vs ENG : उद्या सामना अन् आज खेळाडू पडले आजारी; इंग्लंडच्या ‘इतक्या’ खेळाडूंना बाधा

इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. उद्या(गुरूवार) पासून इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. मात्र या कसोटीपूर्वीच म्हणजेच आदल्या दिवशी पाकिस्तान दौऱ्यावर आलेले इंग्लंडचे खेळाडू आजारी पडले आहेत.

England Team

इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. उद्या(गुरूवार) पासून इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. मात्र या कसोटीपूर्वीच म्हणजेच आदल्या दिवशी पाकिस्तान दौऱ्यावर आलेले इंग्लंडचे खेळाडू आजारी पडले आहेत. बेन स्टोक्ससह इंग्लंडचे 12 खेळाडू आजारी पडले आहेत. त्यामुळे उद्याच्या कसोटी सामान होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (England team 12 members including captain ben stokes have been infected by a virus no covid symptoms)

इंग्लंडच्या खेळाडूंना झालेला आजार हा कोरोनाचा व्हायरस नसल्याचे अनेकांनी स्पष्ट केले. तर काहींनी फुड पॉयझनिंग असल्याचे सांगितले आहे. मागील दौऱ्यावर इंग्लंडच्या खेळाडूंना पाकिस्तानमधील जेवण जेऊन बाधा झाली होती. त्यामुळे यंदा त्यांनी स्वतःचा आचारी सोबत नेला आहे. तरीही इंग्लंडचे खेळाडू आजारी पडले आहेत.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाचा भाग आहेत. पहिला सामना रावळपिंडी येथे 1 ते 5 डिसेंबर, दुसरा सामना मुल्तान येथे 9 ते 13 डिसेंबर आणि शेवटचा सामना कराची येथे 17 ते 21 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. इंग्लंडचे WTC मधील आव्हान संपुष्टात आले आहे.

पाकिस्तानचा संघ –

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, अब्दुला शफिक, अबरार अहमद, अझहर अली, फहीम अशरफ, हारिस रौफ, इमाम उल हक, मोहम्मद अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, नौमान अली, सलमान अली आगा, सरफराज अहमद, सऊद शकील, शान मसूद आणि झाहिद महमूद.


हेही वाचा – IND vs NZ : पंतची पुन्हा अपयशी खेळी; सोशल मीडियावर ‘वी वॉन्ट संजू’ ट्रेंड व्हायरल