इंग्लंडच्या ‘या’ माजी कसोटीपटूचे निधन

इंग्लंडचे (England) आणि ससेक्स क्रिकेटचे (Sussex Cricket) माजी यष्टिरक्षक फलंदाज आणि जिम पार्क्स (Jim Parks) यांचे निधन झाले आहे. ते ९०वर्षांचे होते. जिम पार्क्स हे इंग्लंडचे सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटू (Test Player) होते. त्यांच्या निधनाबाबत ससेक्सने मंगळवारी माहिती दिली.

इंग्लंडचे (England) आणि ससेक्स क्रिकेटचे (Sussex Cricket) माजी यष्टिरक्षक फलंदाज आणि जिम पार्क्स (Jim Parks) यांचे निधन झाले आहे. ते ९०वर्षांचे होते. जिम पार्क्स हे इंग्लंडचे सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटू (Test Player) होते. त्यांच्या निधनाबाबत ससेक्सने मंगळवारी माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, जिम पार्क्स यांचा वर्थिंग येथील रुग्णालयात मृत्यू झाला. मागील आठवड्यात राहत्या घरी पडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जिम पार्क्स यांनी ओल्ड ट्रॅफर्ड येथे एक विशेष फलंदाज म्हणून पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. मात्र, जिम पार्क्स यांना जास्त वेळ खेळण्याची संधी मिळाली नाही. 1959-60 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर ते इंग्लंडच्या कसोटी संघात आले. विशेष म्हणजे आक्रमक खेळी करत त्यांनी त्यावेळी शतकी खेळी केली होती.

46 कसोटी सामने खेळले

पार्क्स यांनी 1954 ते 1968 या कालावधीत 46 कसोटी सामने खेळले होते. त्यानंतरची आणखी वर्षे त्यांनी काउंटी क्रिकेट खेळले. क्रिकटमधून निवृत्त झाल्यानंतर पार्क्स यांनी ब्रुअर व्हिटब्रेडसाठी आणि ससेक्स क्रिकेट क्लबचे (Sussex Cricket Club) विपणन व्यवस्थापक म्हणून काम केले. शिवाय या दोन्ही ठिकाणी अध्यक्ष (Chief) म्हणूनही त्यांनी दोन टर्म कारभार सांभाळला.

दोन शतकांसह 1 हजार 962 धावा

जिम पार्क्स यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये दोन शतकांसह 1 हजार 962 धावा केल्या होत्या. त्यासोबत 103 झेलही घेतले होते. सुरुवातीला डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करणारे पार्क्स नंतर फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून नावारुपाला आले. पार्क्स यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक हजाराहून अधिक वेळा यष्टीमागे खेळाडूंना बाद केले आहे.

जिम पार्क्स यांचा क्रिकेटची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबामध्ये जन्म झाला होता. त्यांचे वडील, जिम सिनिअर आणि त्याचे काका होरेस दोघेही ससेक्स क्रिकेट क्लबसाठी ४०० पेक्षा जास्त वेळा खेळले होते. जिम पार्क्स यांचा मुलगा बॉबीदेखील क्रिकेट खेळाडू आहे. तो हॅम्पशायर आणि केंटसाठी विकेट खेळलेला आहे. जिम पार्क्स यांच्या निधनावर ससेक्स क्रिकेट क्लबने शोक व्यक्त केला आहे.


हेही वाचा – T20 World Cup : माजी खेळाडू आकाश चोप्राने निवडला भारतीय संघ; ‘या’ प्रमुख खेळडूंना वगळले