पॉल कॉलिंगवूड होणार क्रिकेटमधून निवृत्ती

इंग्लंडच्या अॅलेस्टर कूकने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता त्याच्यापाठोपाठ अष्टपैलू खेळाडू पॉल कॉलिंगवूडनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

paul collingwood
सौजन्य - द टेलेग्राफ

इंग्लंड संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू पॉल कॉलिंगवूड आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे . या हंगामाच्या अखेरीस पॉल निवृत्त होणार असून त्याने हा निर्णय गुरूवारी जाहीर केला आहे. २२ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला पॉल वयाच्या ४२ व्या वर्षी निवृत्त होत आहे. इंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टर कूकने भारत आणि इंग्लंड दौऱ्यादरम्यान आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने भारताविरुध्द शेवटच्या कसोटी सामना खेळून निवृत्ती घेतली.

वाचा – इंग्लंडचा महान बॅट्समन अॅलिस्टर कूक होणार निवृत्त !

पॉलच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंड

अत्यंत मानाची मानली जाणारी अॅशेस सिरीज पॉलने इंग्लंडला तीन वेळेस जिंकूण दिली होती. तसेच त्याने २०१० लाही इंग्लंडला टी-२० विश्वचषक जिंकूण दिला होता.

काय म्हणाला पॉल

“बराच विचार केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतो आहे. या हंगामाच्या अखेरीस मी निवृत्ती घेणार आहे, मला माहित होत कधीतरी हा दिवस येणार आहे आणि माझ्यासाठी ही अत्यंत भावनिक वेळ असून मी आतापर्यंत पूर्ण मनापासून मेहनतीने खेळलो आहे.”

पॉलच्या कारकिर्दीवर एक धावता आढावा

पॉलने आपल्या २२ वर्षाच्या कारकिर्दीत ६८ कसोटी सामने, १९७ एकदिवसीय सामने तर ३६ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात १९७ एकदिवसीय सामन्यात ५ शतकांसह ५,०७८ रन , ६८ कसोटी सामन्यात १० शतकांसह ४,२५९ रन केले आहेत तसेच टी-२० मध्ये ३६ सामन्यात ५८३ रन बनविले असून त्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने एकदिवसीय सामन्यात १११, कसोटीमध्ये १७ आणि टी-२० मध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत.

Paul-Collingwood england
पॉल कॉलिंगवुड