Tim Bresnan Retirement:इंग्लंडला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती

इंग्लंडचा अष्टपैलू टिम ब्रेसननने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केलीय. ब्रेसननच्या या वृत्ताला काऊंटी क्लब वॉरविकशायरने दुजोरा दिला आहे. तसेच ३६ वर्षीय ब्रेसननच्या २० वर्षातील करिअरला पूर्णविराम लागला आहे. सर्व क्रिकेटच्या फॉरमॅटमधून ब्रेसनने एकूण १४२ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये २३ कसोटी सामन्यांचा समावेश होता. ब्रेसनन २०१०-२०११ ची एॅशेज मालिका आणि टी-२० वर्ल्डकप २०१० मधल्या टीमचा सहभाग राहीला आहे. देशांतर्गत त्याने २००१-१९ च्या दरम्यान यॉर्कशायरचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानंतर मागील दोन हंगामात ब्रेसननने वारविकशायर काऊंटीसाठी क्रिकेट खेळलं होतं. आता २०२२ मध्ये ब्रेसनने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे.

हा निर्णय खूप कठीण होता. परंतु हिवाळी ट्रेनिंगनंतर मला असं वाटतयं की, हीच ती वेळ आहे. मी माझ्या २१ व्या वर्षाच्या तयारीसाठी पूर्ण ऑफ-सीझनमध्ये मेहनत घेत आहे. मात्र, एकदम अंतर मनातून पाहिलं असता मी त्या यशापर्यंत पोहचू शकत नाही, असं मला वाटतंय, असं ब्रेसननं म्हटलं आहे.

माझं मन २०२२ च्या हंगामात खेळण्याचं

मी ज्या खेळावर प्रेम करतो. त्यासंदर्भात मला खूप उत्साह आहे. परंतु माझं मन २०२२ च्या हंगामात खेळण्याचं आहे. मात्र, शरीर साथ देत नाहीये. मी नेहमी माझ्या करिअरला मोठ्या गर्वाने पाहतो. होम काऊंटी, वारविकशायर आणि देशाचं प्रतिनिधित्व करणं सन्मानाची गोष्ट आहे. मला कधीच विश्वास बसत नव्हता, की मी इतक्या मोठ्या बेस्ट क्रिकेटर्सच्या विरोधात खेळीन, असं ब्रेसनन म्हणाला.

दरम्यान ब्रेसनने २३ कसोटी सामन्यात ५७५ इतक्या धावा काढल्या आहेत. तर ७२ विकेट्स घेतले आहेत. तसेच ८५ वनडे आंतरराष्ट्रीयमध्ये ब्रेसननने १०९ विकेट्स घेतले असता ८७१ इतक्या धावा काढल्या आहेत. ३४ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २४ विकेट्स घेतले आहेत. तर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २१६ धावा काढल्या आहेत.


हेही वाचा : ओमिक्रॉनपेक्षा ओ मित्रो जास्त धोकादायक, शशी थरूर यांची मोदी सरकारवर खोचक टीका