घरक्रीडाइंग्लिश प्रीमियर लीग १७ जूनपासून

इंग्लिश प्रीमियर लीग १७ जूनपासून

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास दोन महिने युरोपमधील फुटबॉल स्पर्धा बंद होत्या. परंतु, आता युरोपातील फुटबॉल पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच जर्मनीतील स्पर्धा बुंडसलिगाला पुन्हा सुरुवात झाली होती. तर आता १७ जूनपासून युरोपातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा इंग्लिश प्रीमियर लीगला पुन्हा सुरुवात होणार आहे. गुरुवारी या स्पर्धेतील २० संघांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून १७ जूनपासून (बुधवार) प्रीमियर लीगला पुन्हा सुरुवात होणार आहे. पहिल्याच दिवशी मँचेस्टर सिटी आणि आर्सनल या बलाढ्य संघांमध्ये सामना होणार असून अ‍ॅश्टन विला आणि शेफील्ड युनायटेड हे संघही आमनेसामने येतील. त्यानंतर १९ ते २१ जूनला वीसही संघांचे ठरलेले सामने होतील. मात्र, हे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रेक्षक नसतील.

- Advertisement -

करोनामुळे १३ मार्चला प्रीमियर लीग स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. मात्र, मागील आठवड्यात खेळाडूंनी छोट्या-छोट्या गटांत पुन्हा सरावाला सुरुवात केली. तसेच बुधवारी एकत्रित सरावालाही परवानगी देण्यात आली. यंदाचा मोसम रद्द झाल्यास प्रीमियर लीगला ७५० मिलियन पौंड्सचा फटका बसला असता. त्यामुळे आता उर्वरित ९२ सामने होणे ही चाहत्यांसह लीगसाठीही आनंदाची बातमी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -