इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इऑन मॉर्गनने (Eoin Morgan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मागील काही दिवसांपासून सतत होणाऱ्या खराब खेळीमुळे मॉर्गनने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इऑन मॉर्गनने (Eoin Morgan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मागील काही दिवसांपासून सतत होणाऱ्या खराब खेळीमुळे मॉर्गनने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मॉर्गनने वयाच्या ३५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Eoin Morgan Retirement) घेतली आहे. आयसीसीने ट्वीट करत इऑन मॉर्गनच्या निवृत्तीची माहिती दिली आहे. (Eoin Morgan announces England retirement from international cricket)

२०१९ साली इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने (Eoin Morgan) न्यूझीलंड संघाला अंतिम सामन्यात मात देत विश्वचषक जिंकला होता. तसेच, २००६ साली आंतरराष्ट्रीय सामन्यांत पदार्पण करणाऱ्या मॉर्गनने १६ वर्षानंतर निवृत्ती स्वीकारली आहे. आधी २००६ ते २००९ आयर्लंडसाठी क्रिकेट खेळलेल्या मॉर्गनने पुढील सर्व वर्षे इंग्लंडसाठी क्रिकेट खेळला.

इंग्लंडकडून इऑन मॉर्गनने २२५ वनडे सामन्यात १३ शतकांसह ६ हजार ९५७ धावा केल्या आहेत. तसेच, आयर्लंड आणि इंग्लंडकडून मिळून ७ हजार ७०१ धावा केल्या आहेत. यामध्ये १४ शतकांचा समावेश आहे. इऑन मॉर्गनने १२६ सामन्यात इंग्लंडचे नेतृत्त्व करत ७६ सामने संघाला जिंकवून दिले आहेत.

सततच्या खराब खेळीमुळे यंदाच्या आयपीएल लिलावात मॉर्गन याला कोणीही बोली लावली नव्हती. तसेच, नेदरलँड्स विरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये तो शून्य धावांवर बाद झाला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तिसऱ्या वनडे सामन्याला तो खेळू शकला नाही.

२०१५ च्या विश्वचषकात इंग्लंडच्या निराशाजनक कामगिरीनंतर अ‍ॅलिस्टर कुकच्या जागी मॉर्गनची वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. इयॉन मॉर्गनने आपल्या कर्णधारपदाखाली इंग्लंड क्रिकेट संघाचे नशीब बदलले.


हेही वाचा – टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड; ऑस्ट्रेलियाला टाकले मागे