घरक्रीडालारा असतानाही विंडीज संघ भारतात जिंकला नाही - जेसन होल्डर

लारा असतानाही विंडीज संघ भारतात जिंकला नाही – जेसन होल्डर

Subscribe

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर विंडीज संघाच्या प्रदर्शनाबाबत बरेच प्रश्न विचारले जात आहेत. पण कर्णधार जेसन होल्डरने संघाचा बचाव करताना म्हटले की लारासारखा खेळाडू असतानाही विंडीजला भारतात जिंकता आले नव्हते.

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा १ डाव आणि २७२ धावांनी पराभव झाला. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाच्या प्रदर्शनाबाबत बरेच प्रश्न विचारले जात आहेत. तसेच दुसऱ्या कसोटीतही भारत विंडीजचा अगदी सहज पराभव करेल असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने आपल्या संघाचा बचाव केला आहे. महान खेळाडू ब्रायन लारा संघात असतानाही वेस्ट इंडिजला भारतात मालिका जिंकता आले नाही असे तो म्हणाला.

११९४ पासून विंडीज भारतात जिंकला नाही

“आम्ही जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल असलेल्या संघाविरुद्ध खेळत आहोत. तेही त्यांच्या घरात. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध जिंकणे कठीण आहे. तसेच विंडीज संघांनी मागील १५-२० वर्षांत भारतात चांगले प्रदर्शन केलेले नाही. १९९४ पासून विंडीजला भारतात कसोटी सामना जिंकता आलेला नाही. या काळात विंडीज संघात ब्रायन लारासारखे महान खेळाडूही होते. त्यामुळे भारताला भारतात हरवणे हे कठीण आव्हान आहे”, असे होल्डर म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -