घरक्रीडानंबर सगळ्यांकडे होता, पण धोनीनेच मेसेज केला; कर्णधारपद सोडल्यानंतरचा विराट कोहलीने सांगितला...

नंबर सगळ्यांकडे होता, पण धोनीनेच मेसेज केला; कर्णधारपद सोडल्यानंतरचा विराट कोहलीने सांगितला किस्सा

Subscribe

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या आशिया चषकातील सुपर ४ मध्ये पाकिस्तानने 5 विकेट्स ठेवून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी कोहलीने भारतीय संघाच्या खेळीवर आणि पराभवाच्या कारणांवर भाष्य केले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या आशिया चषकातील सुपर ४ मध्ये पाकिस्तानने 5 विकेट्स ठेवून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी कोहलीने भारतीय संघाच्या खेळीवर आणि पराभवाच्या कारणांवर भाष्य केले. त्यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्याला धोनीबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी ‘सगळ्यांकडे माझा नंबर होता, पण जेव्हा मी कसोटीचे कर्णधारपद सोडले तेव्हा धोनीशिवाय कुणाचाही मला मेसेजसुद्धा आला नाही”, असे कोहली याने सांगितले. (everyone have my number but only ms dhoni messaged me when i quit test captaincy says virat kohli)

“मी तुम्हाला सांगू इच्छितो की, जेव्हा कसोटीचे कर्णधारपद सोडले तेव्हा माझ्याकडे फक्त एकाच व्यक्तीचा मेसेज आला, ज्यांच्यासोबत मी खेळलो आणि तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी. अनेकांकडे माझा नंबर आहे, पण मला बरेच लोक टीव्हीवरून सल्ला देत असतात की काय करायचे आहे. त्यांच्याकडे बोलायला भरपूर असते पण नंबर असूनही त्यांचा एकही मेसेज आला नाही”, असे विराट कोहली याने प्रसारमाध्यमांशी मनमोकळे पणाने गप्पा मारताना सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 44 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 60 धावांची खेळी केली. या सामन्यात विराट कोहलीचा गेलेला फॉर्म पुन्हा पाहायला मिळाला. विराट कोहलीने आशिया चषक 2022 मध्ये 2 अर्धशतकांसह 150 धावा केल्या आहेत. आशिया चषकामध्ये त्याच्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्यामध्ये सध्या फक्त पाकिस्तानचा मोहम्मद रिजवान आहे.

विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात 2021 च्या आधी नेतृत्व सोडणार असल्याची घोषणा केली. विश्वचषकानंतर आपण टी-20 चे कर्णधारपद सोडणार असून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदी असणार असल्याचे सांगितले होते. मात्र बीसीसीआयने पुढच्याच मालिकेनंतर त्याचे एकदिवसीय संघाचं नेतृत्व काढून घेतले. त्यानंतर डिसेंबर-जानेवारीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटीत १-२ ने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर विराटने कसोटी संघाचे नेतृत्वही सोडले.

- Advertisement -

हेही वाचा – आशिया चषक : पाकिस्तानचा 5 गडी राखून भारतावर दमदार विजय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -