घरक्रीडाIPL 2021 : विराट कोहली जगात सर्वोत्तम, त्याच्याकडून शिकण्यास उत्सुक! 

IPL 2021 : विराट कोहली जगात सर्वोत्तम, त्याच्याकडून शिकण्यास उत्सुक! 

Subscribe

मॅक्सवेलला कोहलीच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचे प्रतिनिधित्व करताना कर्णधार विराट कोहलीकडून काही गोष्टी शिकण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे विधान ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने केले. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या लिलावात मॅक्सवेलला बंगळुरूने १४.२५ कोटी रुपयांत खरेदी केले. त्यामुळे आता मॅक्सवेलला कोहलीच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळणार आहे. मॅक्सवेल मागील मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. मात्र, त्याला १३ सामन्यांत केवळ १०८ धावाच करता आल्या. तर गोलंदाजीत त्याने केवळ ३ विकेट घेतल्या. त्यामुळे पंजाबने यंदाच्या खेळाडू लिलावाआधी त्याला संघाबाहेर केले. परंतु, आता बंगळुरूने त्याच्यावर विश्वास दाखवला असून तो दमदार कामगिरी करण्यास सज्ज आहे.

कोहलीची उत्कृष्ट कामगिरी 

बंगळुरूकडून खेळणे हा क्रिकेटपटू म्हणून माझ्या कारकिर्दीतील पुढचा टप्पा असणार आहे. कोहली हा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू असून त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारताचा कर्णधार म्हणून कोहलीवर खूप दडपण असते. परंतु, हे दडपण कसे हाताळायचे आणि चांगली कामगिरी कशी करायची हे त्याला ठाऊक आहे. त्यामुळे त्याच्याकडून काही गोष्टी शिकण्यास मी उत्सुक आहे, असे मॅक्सवेल म्हणाला.

- Advertisement -

वेळापत्रक अजून निश्चित नाही

आयपीएल स्पर्धा यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होईल अशी चर्चा आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक अजून निश्चित झालेले नसले तरी बंगळुरूकडून लवकरच सामने खेळण्यासाठी मॅक्सवेल उत्सुक आहे. कोहली सामन्यासाठी कशाप्रकारे तयारी करतो, तो कसा सराव करतो याचे मी निरीक्षण करणार आहे. तसेच कर्णधार म्हणूनही मला त्याच्याकडून काही गोष्टी शिकता येतील अशी आशा आहे, असेही मॅक्सवेलने सांगितले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -