घरक्रीडाक्रिकेटरपासून अंपायरपर्यंत सगळंच बोगस, गुजरातमध्ये IPLचे फेक नेटवर्क

क्रिकेटरपासून अंपायरपर्यंत सगळंच बोगस, गुजरातमध्ये IPLचे फेक नेटवर्क

Subscribe

इंडियन प्रीमियर लीग हे संपूर्ण जगातील सर्वात मोठं लीग समजलं जातं. या लीगमध्ये अनेक परदेशातील खेळाडूंचा सहभाग असतो. मात्र, हे सर्व अधिकृत मार्गाने सुरू असतं. परंतु क्रिकेटरपासून अंपायरपर्यंत सगळंच बोगस असल्याचं गुजरातमधून उघडकीस आलं आहे. बनावट क्रिकेट लीग, मैदान, क्रिकेटपटू आणि कमेंटेटर यावर परदेशातून लोकं सट्टा लावत आहेत. ही गोष्ट जरी चित्रपटासारखी वाटत असली तरी ती वास्तवात घडली आहे.

गुजरातमधील वडनगरमध्ये एका गावात इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) पार्श्वभूमीवर काही लोक बनावट क्रिकेट लीग चालवत होते, ज्यामध्ये रशियामधून सट्टेबाजी केली जात होती. एक प्रकारचं फेक नेटवर्क तयार करण्यात आलं होतं आणि आता त्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी मेहसाणा पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. चौघांविरुद्ध फसवणूक, सट्टेबाजी आणि इतर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणात एका आरोपीचा शोध सुरू आहे, जो रशियात राहतो आणि तेथून सट्टेबाजीचा संपूर्ण खेळ चालवत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, वडनगरच्या मॉलीपूर गावात काही लोकांनी शेत विकत घेतले होते. याठिकाणी त्याचे क्रिकेटच्या मैदानात रूपांतर करण्यात आले, फ्लड लाइट्स लावण्यात आले आणि ग्राऊंडही तयार करण्यात आलं. मल्टी कॅम सेटअप, कॉमेंट्री बॉक्ससह सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती, जेणेकरून ते संपूर्ण आयपीएलसारखे दिसेल. इतकंच नाही तर हा सामना मोबाईल अॅपवरही लाईव्ह होता.

- Advertisement -

त्यासाठी गावातील काही तरूण मंडळींना कामावर ठेवले होते, त्यांना प्रत्येक सामन्यासाठी ४०० रुपये मिळायचे. स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रशियात बसलेला व्यक्ती सर्व व्यवस्था करत असे आणि त्याच्या सांगण्यावरून हा सर्व खेळ रचण्यात आला होता.

सट्टेबाजीच्या दरानुसार गावकऱ्यांना कधी चौकार मारायचा, केव्हा आऊट करायचे हे सांगण्यात यायचे. पोलिसांनी आरोपींकडून क्रिकेट किट, स्पीकर, लाईट, मल्टी कॅमेरा सेटअपसह अनेक गोष्टी जप्त केल्या आहेत. तसेच एक व्यक्ती भारतीय आणि सुप्रसिद्ध कॉमेंटेटर हर्षा भोगलेच्या आवाजात क्रिकेट कॉमेंट्री करत होता. खुद्द हर्षा भोगले यांनीही एक ट्विट केलं आहे, ज्यामध्ये ते म्हणालेत की, मला या कॉमेंटेटरला भेटायला नक्की आवडेल.


हेही वाचा : विम्बल्डन स्पर्धेच्या महिला गटात एलेना रिबाकिना विजयी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -