Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाInd VS Pak : पाकिस्तान हरतोय पाहून चाहता भारताच्या बाजूने झाला, व्हिडीओ होतोय व्हायरल

Ind VS Pak : पाकिस्तान हरतोय पाहून चाहता भारताच्या बाजूने झाला, व्हिडीओ होतोय व्हायरल

Subscribe

भारताच्या विजयामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद असलेल्या पाकिस्तान संघाचे स्पर्धेबाहेर जाणे पक्के झाले आहे. यानंतर आता सोशल मीडियावर पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली जात आहे. अशातच पाकिस्तानच्या एका चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तान हरतोय हे पाहून चाहत्याने चक्क भारताची जर्सी परीधान केल्याचे व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दुबईमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद असलेल्या पाकिस्तान संघाचे स्पर्धेबाहेर जाणे पक्के झाले आहे. यानंतर आता सोशल मीडियावर पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली जात आहे. अशातच पाकिस्तानच्या एका चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तान हरतोय हे पाहून चाहत्याने चक्क भारताची जर्सी परीधान केल्याचे व्हिडीओ पाहायला मिळत आहे. (Fan wears India jersey after seeing Pakistan losing during Champions Trophy)

पाकिस्तान संघाने दिलेले 242 धावांचे आव्हान भारताने सहज पूर्ण केले. कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमाकांवर आलेल्या विराट कोहलीने सलामीवीर शुभमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची संयमी भागीदारी रचली. मात्र शुभमन गिल आपल्या अर्धशतकापासून 4 धावा बाकी असताना बाद झाला. यानंतर आलेल्या श्रेयसने विराटसोबत तिसऱ्या विकेटसाठी 114 धावांची विजयी भागीदारी रचली. दोन्ही खेळाडू भारताला विजय मिळवून देतील असे वाटत असतानाच श्रेयस 56 धावांवर बाद झाला.

हेही वाचा – IND vs PAK : भारतीय संघाने केला पाकिस्तानचा पराभव, दिल्ली पोलिसांनी उडवली टर

हार्दिक पांड्याच्या रुपात भारताला चौथा झटका बसला. परंतु तोपर्यंत भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ पोहचला होता. अशावेळी विराट कोहली आपले शतक पूर्ण करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र 42 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूंवर चौकार मारत विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 51 वे शतक अगदी दणक्यात साजरे केले आणि भारताला विजय मिळवून दिला. भारताच्या या विजयानंतर पाकिस्तानी चाहत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसते की, अनेक पाकिस्तानी चाहते स्टँडमध्ये एका रांगेत बसलेले आहेत. भारत हा सामना जिंकेल असे जेव्हा पाकिस्तानी चाहत्याला वाटले तेव्हा त्याने भारताची निळी जर्सी हातात घेतली आणि कॅमेऱ्यात पाहून हसायला लागला. यानंतर त्याने पाकिस्तानच्या हिरव्या जर्सीवर भारताची जर्सी घातली. पाकिस्तानी चाहता भारताची जर्सी घालत असल्याचे समजताच भारतीय चाहत्यांनी त्याचे कौतुक केले. यानंतर पाकिस्तानी चाहत्याने स्टेडियममध्ये उभे राहून भारतीय संघाला प्रोत्साहन दिले. पाकिस्तानी चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय चाहते मजेदार प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत. एका युझर्सने म्हटले की, अशाच प्रकारे, एक दिवस पाकिस्तान देखील स्वतःला भारतासमोर शरण जाईल. कारण ते स्वतः काहीही करू शकत नाहीत. त्यांना आश्रयासाठी भारतात परतावे लागेल.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : सर्वच संपले आहे, पाकिस्तानचा कर्णधार रिझवानने केले मान्य