MS Dhoni, Suresh Raina एकाच वेळी निवृत्त, चाहत्यांना काहीच सुचेना! ट्वीटरवर पाऊस!

ms dhoni and suresh raina retires

Captain Coon MS Dhoni ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर लगेच अर्ध्या तासात भारताचा डावखुरा फलंदाज Suresh Raina याने देखील निवृत्तीची घोषणा केल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या दोघांची जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणेच IPL मध्ये देखील दिसून आली आहे. दोघे IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतात. रैना धोनीला क्रिकेटमधला आपला मेंटॉरच मानतो. त्यामुळे धोनीने निवृत्तीची घोषणा करताच रैनाने देखील निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या आवडीचे दोघे क्रिकेटपटू एकाच वेळी निवृत्त झाल्यामुळे चाहत्यांना मात्र काही सुचेनासं झालं आहे. या दोघांच्या चाहत्यांच्या ट्वीट्सचा ट्वीटरवर पाऊस पडू लागला आहे. तसेच, त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्ट्सवर देखील चाहते व्यक्त होत आहेत.


वाचा सविस्तर – MS Dhoni पाठोपाठ Suresh Raina चीही निवृत्तीची घोषणा!