घरक्रीडाआळशी सरफराजला नेटकऱ्यांनी केले 'ट्रोल'

आळशी सरफराजला नेटकऱ्यांनी केले ‘ट्रोल’

Subscribe

पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदला नेटिझन्सने आळस दिल्यामुळे चांगलेच ट्रोल केले आहे.

अखेर ज्याची शक्यता होती, नव्हे खात्रीच होती, तेच झालं. भारतानं पुन्हा एकदा वर्ल्डकपमधल्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली! मात्र, या लढती दरम्यान पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे. सातत्याने आळस देणाऱ्या सरफराजची नेटिझन्सने खिल्ली उडवली आहे. नेटकऱ्यांनी ट्विटरवर सरफराजच्या या कृतीची टेर उडवली असून यावर मीम्सही बनवले आहेत.


हेही वाचा – जावाईबापू शून्यावर बाद! शोएब मलिक सोशल मीडियावर ट्रोल

- Advertisement -

भारताची फलंदाजी सुरु असताना ४७ व्या षटकात अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसाने एन्ट्री केल्यामुळे अर्धा तासाचा ब्रेक देण्यात आला. अर्धा तासाच्या ब्रेकनंतर खेळाडू पुन्हा मैदानात उतरले. ब्रेकनंतर मैदानात उतरेला पाकिस्तानचा कर्णधार आळसावलेला दिसून आला. यष्ट्यांमागे आपली जागा सांभाळल्यानंतर सरफराजने आळस दिला; तोच क्षण कॅमेरामध्ये कैद झाला आणि नेटिझन्सने यावर निशाणा साधला आणि सरफराज चांगलाच ट्रोल झाला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -