घरक्रीडाभारताची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी अखेर निवृत्त; शेवटच्या सामन्यात घेतले 2 बळी

भारताची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी अखेर निवृत्त; शेवटच्या सामन्यात घेतले 2 बळी

Subscribe

भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी अखेर निवृत्त झाली आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात तिने 2 गडी बाद केले. तसेच, भारताने इंग्लंड विरुद्धची मालिका 3-0 ने जिंकली.

भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी अखेर निवृत्त झाली आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात तिने 2 गडी बाद केले. तसेच, भारताने इंग्लंड विरुद्धची मालिका 3-0 ने जिंकली. हा सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी झूलन गोस्वामीचे विशेष आभार मानले. तिला खांद्यावर घेत संपूर्ण मैदानाचा एक फेरा घेत तिला निरोप दिला. (Faster Bawler jhulan goswami last match indian women team won odi series by 3 0 against england)

झूलन गोस्वामीने याआधीच निवृत्तीची घोषणा केली होती. झूलन जेव्हा फलंदाजीला मैदानात उतरली तेव्हा इंग्लंडच्या खेळाडूंनी तिला गार्ड ऑफ ऑनरही दिला. नुकताच झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला 16 धावांनी पराभूत केले. तब्बल 23 वर्षांनी इंग्लंडला त्यांच्याच देशात भारतीय संघाने पराभूत केले. याआधी 1999 मध्ये भारताने अशी कमाल केली होती.

- Advertisement -

भारताकडून शेवटच्या सामन्यात रेणुका सिंहने 4 विकेट घेतल्या तर अखेरचा सामना खेळणाऱ्या झूलनने 2 तर राजेश्वरी गायकवाडने दोन विकेट घेतल्या. इंग्लंडच्या संघाला 43.4 षटकात 153 धावांपर्यंतच मजल मारता आली.

या सामन्यात भारताने 170 धावांचे आव्हाना इंग्लंडसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. त्यांच्या विकेट गेल्याने 53 धावांवर 6 गडी बाद अशी अवस्था झाली होती. इंग्लंडच्या तब्बल 6 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

- Advertisement -

भारतीय महिला संघाला 169 धावाच करता आल्या होत्या. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाचा डाव 45.4 षटकात गुंडाळला. अष्टपैलू दीप्ति शर्माने भारताकडून 106 चेंडूत 68 धावा केल्या. तर सलामीची फलंदाज स्मृती मंधाना हिने 79 चेंडूत 50 धावांची खेळी केली.


हेही वाचा – धोनी आयपीएलमधून होणार निवृत्त?, FB Liveच्या माध्यमातून करणार मोठी घोषणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -