ठाणे जिल्हा जलतरण स्पर्धेत फादर अग्नेल संघाला विजेतेपद

ठाणे : ठाणे जिल्हा जलतरण संघटना आयोजित ठाणे जिल्हा जलतरण स्पर्धेत वाशीच्या फादर अग्नेल संघाच्या जलतरणपटूंनी निर्विवाद वर्चस्व राखत सर्वसाधारण विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. नवी मुंबई स्पोर्ट्स असॊसिएशनच्या तरणतलावात पार पडलेल्या स्पर्धेत फादर अग्नेलच्या जलतरणपटूंनी तब्बल १८० गुंणाची कमाई करत हे यश संपादन केले. तर ८० गुण मिळवणाऱ्या कळव्याच्या डॉल्फिन स्विमिंग क्लबला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

सुमारे २०० हुन अधिक जलतरणपटूंचा सहभाग असलेल्या स्पर्धेत १७ वर्ष वयोगटात ऋषभ दासने मुलांमध्ये तर मुलींमध्ये प्रतिष्ठा डांगीने मुलींमध्ये वैयक्तिक विजेतेपद मिळवले. १४ वर्षाखालील गटात विहान जेजुरकर व अहविहा गांधी अनुक्रमे मुलं आणि मुलींमध्ये अव्वल ठरले. १२ वर्षाखालील वयोगटात तोशल भिरूड व अमिता कुडवाने इवैक्तिक विजेतेपदाच्या शर्यतीत इतरांना मागे टाकले. १० वर्षाखालील मुलांमध्ये रेहान सय्यद,आणि मुलींमध्ये लक्ष्मी शिरापरप्पूने बाजी मारली. ८ वर्षाखालील गटात इवान शहा आणि मलेशिया शेट्टी, ६ वर्षाखालील गटात इब्राहिम खान,दूर्वा कुरणकर यांनी वैयक्तिक विजेतेपद पटकावले.

नवी मुंबई महापालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांनी स्पर्धंचे रीतसर उदघाटन केले. यावेळी राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील जलतरणपटूंचा गौरव करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे काळजीवाहू अध्यक्ष मयूर व्यास, ऑफिशियल ऑलम्पिक डायव्हिंग व फीना रेफ्री तसेच मुंबई स्विमिंग असोसिएशनचे सचिव किशोर शेट्टी व कल्पना हजारे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.


हेही वाचा : मुंबई मॅरेथॉनमध्ये ५५ वर्षीय धावपटूचा हृदयविकाराने मृत्यू