घरक्रीडाफिफा विर्ल्डकप : उरुग्वे आणि ब्राझीलचे 'बॅगपॅक'

फिफा विर्ल्डकप : उरुग्वे आणि ब्राझीलचे ‘बॅगपॅक’

Subscribe

बेल्जियमच्या संघाने बलाढय ब्राझीलचा पराभव करुन तब्बल ३२ वर्षांनी वर्ल्डकपची उपांत्यफेरी गाठली. तर दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सने उरुग्वेवर २-० अशी मात केली.

फिफा वर्ल्डकपमध्ये उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत पराभूत होण्याची वाईट परंपरा ब्राझीलने यावर्षी देखील कायम ठेवली आहे. बेल्जियमने ब्राझीलवर २-१ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ब्राझीलने अखेरच्या मिनिटाला सोप्या संधी गमावल्याने त्यांना पराभूत व्हावं लागलं. २००२ पासून आतापर्यंत ब्राझीलचा संघ जेतेपदापासून दूर राहिला आहे. ब्राझीलला परभवाची चव चाखायला लावणारा बेल्जियमचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तर दुसऱ्या बाजूला फ्रान्सने उरुग्वेविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीत धडाक्यात प्रवेश केला आहे. दोन्ही सत्रात प्रत्येकी एक गोल लगावत फ्रान्सने उरुग्वेवर २-० असा विजय मिळवला. दोन्ही विजेते फ्रान्स आणि बेल्जियम उपांत्य फेरीत भीडतील.

ब्रुयनेचा १०० वा गोल

ब्राझील विरुद्ध बेल्जियम सामन्यांत बेल्जियमच्या गोलरक्षक थिबाऊट कोर्टोइस आणि इतर खेळाडूंनी अप्रतिम बचाव केला. स्ट्राईकर्सच्या उत्कृष्ट आक्रमनामुळे बेल्जियमने पहिल्या सत्रात ब्राझीलवर २-० अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या १३ व्या मिनिटाला बेल्जियमने आघाडी घेतली. ३१ व्या मिनिटाला डेव्हीड ब्रुयनेने गोल करत बेल्जियमला आघाडी २-० अशी भक्कम आघीडी मिळवून दिली. ब्रुयनेने केलेला गोल हा यंदाच्या विश्वचषकातील १०० वा गोल ठरला. दुसऱ्या सत्रात ७६ व्या मिनिटाला ब्राझीलच्या संघाला गोल करता आला. रेनाटो ऑगस्टोने ब्राझिलचे गोल खाते उघडले. त्यानंतर ब्राझीलला अनेकदा सोप्या संधी मिळाल्या परंतु या संधींचे ब्राझीलच्या खेळाडुंना सोनं करता आलं नाही. त्यामुळेच ब्राझीलला पराभवाला सामोरे जावे लागले.

- Advertisement -

फ्रान्स वि. उरुग्वे २-०

फ्रान्स विरुद्ध उरुग्वे सामन्यात फ्रान्सने सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर दिला. पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत फ्रान्सच्या वरानने ४० व्या मिनिटाला पहिला गोल केला. दुसऱ्या सत्रात ग्रीझमनने ६१ व्या मिनिटाला गोल करून ही आघाडी वाढवली. मिळालेली आघाडी सामन्याच्या शेवटपर्यंत कायम ठेवली. उरुग्वेच्या संघाला फ्रान्सच्या बचाव फळीने शेवटपर्यंत गोल करु दिला नाही. त्यामुळे हा सामना फ्रान्सने २-० असा सहज जिंकला.

युरोपियन देशांसमोर ब्राझील फिकं

गेल्या चार विश्वचषक स्पर्धांच्या बादफेरीत ब्राझीलच्या संघाला युरोपियन देशांकडून पराभव पत्कारावा लागला आहे. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्राझीलचा संघ युरोपियन देशांवर भारी पडायचा. परंतु गेल्या १६ वर्षात युरोपातल्या आघाडीच्या संघांसमोर ब्राझीलचा फीका ठरत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -