घरक्रीडाFIFA WORLD CUP 2022 : क्वालिफायर सामन्यात अधिकाऱ्यांची धाव

FIFA WORLD CUP 2022 : क्वालिफायर सामन्यात अधिकाऱ्यांची धाव

Subscribe

अर्जेंटिनाच्या चार खेळाडूंवर कोविड प्रोटोकॉल मोडल्याचा आरोप

ब्राझील विरुद्ध अर्जेंटिना यांच्यातील फिफा विश्वचषक – २०२२ पात्रता सामन्यावेळी मोठी नाट्यमय घटना घडल्याचे दिसून आले त्यामुळे तो सामना पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोना व्हायरस प्रोटोकॉलचे अर्जेंटिनाच्या चार खेळाडूंनी उल्लंघन केल्याने चालू सामन्यावेळी नाट्यमय घटना घडली. कोरोना प्रोटोकॉलचे पालन न करणाऱ्या खेळाडूंना बाहेर काढण्यासाठी स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना मैदानात धाव घ्यावी लागली. यावेळी अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आणि ब्राझीलचा नेमारही सामन्यात खेळत होते. दोन्ही संघ शून्यगोल्सच्या बरोबरीत असताना सामना सातव्या मिनिटाला थांबवावा लागला.

खेळाडू, प्रशिक्षक, फुटबॉल अधिकारी आणि स्थानिक अधिकारी यांच्यात यावेळी बरीच चर्चा झाली. ब्राझीलच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की, इंग्लंडमधून परतलेले अर्जेंटिनाचे तीन खेळाडू विलगीकरणात असायला हवे होते, पण ते सामना खेळत होते. विश्वचषक पात्रता फेरीसाठी सुरू असलेल्या या सामन्याचे आता पुढे काय करायचे, याचा निर्णय फिफाला घ्यावा लागणार आहे.

- Advertisement -

ब्राझीलच्या आरोग्य संस्थेचे अध्यक्ष अँटोनियो बॅरा टोरेस यांनी सांगितले की, ब्राझीलचा सरकारचा कोरोना प्रोटोकॉल मोडल्याबद्दल अर्जेंटिनाच्या त्या सर्व खेळाडूंना दंड आकारून परत पाठवले जाईल. चौघांना क्वॉरंटाईनमध्ये राहण्यास सांगितले गेले होते, पण त्यापैकी तिघे सामना खेळण्यासाठी मैदानात आले होते, ते नियमांचे उल्लघन करताना दिसले.

एस्टन व्हिलाचा एमिलियानो मार्टिनेझ आणि एमिलियानो बुएंडिया आणि टोटेनहॅमचा जिओव्हानी लो सेल्सो आणि क्रिस्टियन रोमेरो हे प्रीमियर लीग खेळून इंग्लंडहून ब्राझीलला परतले होते. त्यांना दहा दिवस विलगीकरणात राहण्यास सांगितले होते, पण ते खेळण्यासाठी थेट मैदानात उतरले. ब्राझीलचे कोरोना प्रोटोकॉल कठोर असल्याने त्या चार खेळाडूंच्या अडचणीत भर पडली आहे.विश्वचषक पात्रता फेरीसाठी सुरू असलेल्या या सामन्याचे आता पुढे काय करायचे सामना पुन्हा केव्हा खेळवला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ENG VS IND TEST SERIES : कोहली आणि रवी शास्त्रींवर बीसीसीआय संतापले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -