फिफा वर्ल्ड कपमधील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट खेळाडू, जाणून घ्या कोणाला मिळालेत सर्वाधिक गोल्डन शूज

ज्याप्रमाणे क्रिकेटमधील संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’हा पुरस्कार दिला जातो, त्याचप्रमाणे फुटबॉलमध्ये गोल्डन शू हा पुरस्कार दिला जातो. या संपूर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंनी सर्वाधिक गोल केले आहेत. फिफा वर्ल्डकपमध्ये गोल्डन शू देण्याची सुरूवात १९३० च्या विश्वकपापासून झाली. फिफा वर्ल्डकपच्या इतिहासात असं फक्त तीन वेळा घडले आहे की, सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूची संख्या एकापेक्षा जास्त असेल. २००६ पर्यंत या खेळाडूला गोल्डून शू म्हणून ओळखले जात होते.

प्रथम गोल्डन शू कोणाला ?

या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन शू पुरस्कार दिला जातो. दुसऱ्या खेळाडूला सिल्व्हर शू आणि तिसऱ्या खेळाडूला ब्राँझ शू देण्यात येतो. पहिला पुरस्कार अर्जेंटिनाचा खेळाडू गुलेर्मो स्टॅबिले याला देण्यात आला. त्याने ८ गोल केले होते. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने २०१८ च्या वर्ल्ड कपमध्ये हा पुरस्कार जिंकला होता. त्यानेही ६ गोल केले होते.

कोणाला मिळालेत सर्वाधिक गोल्डन शूज?

वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूबद्दल बोलायचे झाले तर हा विक्रम फ्रान्सच्या जस्ट फॉन्टेनच्या नावावर आहे. त्याने एकूण १३ गोल केले होते. गोल्डन शू पुरस्कार सुरू झाल्यापासून एका स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम ब्राझीलच्या रोनाल्डोच्या नावावर आहेत. २००२ मध्ये त्याने ८ गोल केले होते.

विश्व चषक                            खेळाडू                              गोल
२०१८ रशिया हॅरी                  केन (इंग्लंड)                             ६
२०१४ ब्राझील जेम्स                रॉड्रिग्ज (कोलंबिया)                      ६
२०१० दक्षिण                 आफ्रिका थॉमस मुलर (जर्मनी)                 ५

२००६ जर्मनी                   मिरोस्लाव क्लोस (जर्मनी)                    ५
२००२ कोरिया / जपान                रोनाल्डो (ब्राझील)                    ८
१९९८ फ्रान्स                     डेव्हर सुकर (क्रोएशिया)                    ६


हेही वाचा : डेव्हिड वॉर्नर पुन्हा फॉर्मात, शतकी खेळीनंतर झाला भावूक