Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा मेस्सीची स्वप्नपूर्ती! अर्जेंटिनाने कोरले फिफा चॅम्पियनशिपवर नाव

मेस्सीची स्वप्नपूर्ती! अर्जेंटिनाने कोरले फिफा चॅम्पियनशिपवर नाव

Subscribe

कतारमध्ये रंगलेल्या फिफा वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 चा अंतिम सामना 18 जानेवारी रोजी झाला. या स्पर्धेत ब्लॉकबस्टर चॅम्पियन फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रंगतदार मुकाबला झाला. किलियन एमबाप्पे आणि लिओनेल मेस्सीसारख्या मातब्बर खेळांडूमुळे हा सामना रंगतदार झाला. हा केवळ सामना नव्हता तर लिओनेल मेस्सी सारख्या खेळाडूने गेल्या वीस वर्षांपासून पाहिले एक स्वप्न होते. जे स्वप्न अखेर पूर्ण झाले. या सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सला धूळ चारत फिफा चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले. मेस्सीने आपल्या फुटबॉल करियरमधील अखेरच्या सामान्यात स्वत:ला सिद्ध करत एक चमकदार कामगिरी केली. अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 4-2 असा पराभव करत 36 वर्षांनंतर चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले.

मेस्सीचे दोन गोल आणि शूटआऊटमधील तिसरा गोल यामुळे अर्जेंटिनाने कायलियन एमबाप्पेच्या हॅट्ट्रिकनंतरही फ्रान्सचा पराभव केला. एमबाप्पे विश्वचषक स्पर्धेत हॅट्ट्रिक करणारा 56 वर्षांतील पहिला खेळाडू ठरला, पण त्याला विजेतेपद राखता आले नाही. त्याचवेळी शेवटचा विश्वचषक खेळत असलेल्या मेस्सीने विजेतेपदावर आपल्या कामगिरी कामगिरीने महानतेची मोहर उमटवली. दिएगो मॅराडोनानंतर (1986) आपल्या संघाला विश्वचषक मिळवून देत मेस्सी हा पेले आणि मॅराडोनासारख्या महान खेळाडूंच्या यादीत जाऊन बसला.

- Advertisement -

या स्पर्धेत एमबाप्पेचेही कौतुक करावे तितके कमी आहे, कारण तो भविष्यात नक्कीच अनेक कामगिरी आपल्या नावावर नोंदवेल. त्याच्या तीन गोलमुळे एकतर्फी वाटणाऱ्या या अंतिम फेरीत जीव आला. फायनलमध्ये हॅट्ट्रिक करणारा तो 1966 नंतरचा पहिला खेळाडू ठरला पण कालचा दिवस हा मेस्सीच्या नावावर होता. विजेतेपदाचे दावेदार म्हणून या सामन्यात उतरलेल्या फ्रान्सवर दिग्गज लिओनेल मेस्सी याच्या नेतृत्वातील अर्जेंटिना संघाने सुरुवातीपासून वर्चस्व राखले.

- Advertisement -

मैदानावर जमलेली प्रचंड गर्दी, टेलिव्हिजनला चिकटून बसलेले जगभरातील करोडे फुटबॉल चाहते प्रत्येक क्षण अनुभवत होते, कारण प्रत्येक सेकंदाला मॅच एक रोमांचकारी वळणावर येऊन पोहचत होती. अशात अर्जेंटिनाने 80व्या मिनिटाला मेस्सी (23व्या मिनिटाला) आणि एंजल डी मारियो (36व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे 2-0 अशी आघाडी घेतली. मात्र एमबाप्पेने 80व्या आणि 81व्या मिनिटाला दोन गोल करून सामना अतिरिक्त वेळेत नेला.

अतिरिक्त वेळेच्या 108 व्या मिनिटाला मेस्सीने गोल केला, त्यानंतर दहा मिनिटांनी एमबाप्पेने बरोबरी साधत सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेला. शूटआऊटमध्ये पर्यायी खेळाडू गोन्झालो मॉन्टिएलने निर्णायक पेनल्टीवर गोल केला, तर फ्रान्सच्या किंग्सले कोमॅन आणि ओरेलियेन चौमेनी हे लक्ष्य चुकले.

अर्जेंटिनाच्या या विजयासह गेल्या चार विश्वचषकातील युरोपच्या जेतेपदाला रोख लागला आहे. 2002 मध्ये जपान आणि दक्षिण कोरियामध्ये ब्राझीलने शेवटचा विश्वचषक जिंकला होता. अर्जेंटिनाने यापूर्वी 1978 आणि 1986 मध्ये विजेतेपद पटकावले होते. गेल्या वर्षी कोपा अमेरिका जिंकणाऱ्या अर्जेंटिनाने सलग दुसरे मोठे विजेतेपद पटकावले आहे.


आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन; विरोधक-सत्ताधारी सज्ज, कोणते मुद्दे गाजणार?

- Advertisment -