Eco friendly bappa Competition
घर क्रीडा यंदाचा फिफा फूटबॉल विश्वचषक कतारमध्ये रंगणार; १७ लाख कोटींचा खर्च, कडक सुरक्षाव्यवस्था

यंदाचा फिफा फूटबॉल विश्वचषक कतारमध्ये रंगणार; १७ लाख कोटींचा खर्च, कडक सुरक्षाव्यवस्था

Subscribe

यंदा FIFA विश्वचषक कतारमध्ये होणार आहे. २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत हा विश्वचषक होणार असून, या स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी होत आहेत. यामध्ये आशियातील ६ संघ सहभागी होत आहेत.

यंदा FIFA विश्वचषक कतारमध्ये होणार आहे. २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत हा विश्वचषक होणार असून, या स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी होत आहेत. यामध्ये आशियातील ६ संघ सहभागी होत आहेत. फिफा आणि यजमान कतार विश्वचषकावर १७ लाख कोटी रुपये खर्च करणार आहेत. फुटबॉलच्या इतिहासातील हा सर्वात महागडा विश्वचषक असल्याचे बोलले जात आहे. (fifa world cup qatar 2022 preparation cost most expensive world cup in football history)

फिफा विश्वचषकासाठी कडक सुरक्षाव्यवस्था

 • सुरक्षेच्या कारणास्तवर कतारने युरोपमधील सर्वात मोठ्या सुरक्षा कंपनीकडून ६५ हजार कोटी रुपये खर्चून २४ लढाऊ विमाने आणि ९ अत्याधुनिक हॉक MK-167 प्रशिक्षण जेट खरेदी केले होते.
 • हेलिकॉप्टर आणि त्यात वापरण्यात येणारी सुरक्षा उपकरणेही विविध कंपन्यांकडून केवळ विश्वचषकासाठी खरेदी करण्यात आली आहेत.
 • ब्रिटनचे १२ टायफून स्क्वॉड्रन कतारच्या सुरक्षेत तैनात असणार आहेत.
 • ब्रिटन कतारला विशेष सुरक्षारक्षक देखील पुरवणार असून, कतारचे राष्ट्रीय सुरक्षा केंद्र हे ड्रोन, सीसीटीव्ही आणि सेन्सरद्वारे संपूर्ण देशावर लक्ष ठेवणार आहे.
- Advertisement -

२० हजारांहून अधिक स्वयंसेवक

 • कतारमध्ये २ महिन्यांपासून २० हजारांहून अधिक स्वयंसेवक विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहेत.
 • या स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
 • १६० हून अधिक देशांमधून ही लोक कतारमध्ये आले आहेत.
 • यामध्ये १८ ते ७७ वयोगटातील लोकांचा समावेश आहे.
 • या स्वयंसेवकांना कोणतेही मानधन मिळत नाही. केवळ निवास आणि भोजनाची व्यवस्था फिफाकडून केली जाते.
 • हे स्वयंसेवक वेगवेगळ्या स्टेडियममध्ये १० शिफ्टमध्ये वेगवेगळ्या विभागात काम करतील.

संघांसाठी लक्झरी सुविधा

- Advertisement -

इंग्लंडचा संघ

 • इंग्लंडचा संघ दोहाजवळील अल वक्राह शहरातील अल-वक्रा रिसॉर्टमध्ये मुक्काम करणार आहे.
 • हे ५-स्टार रिसॉर्ट समुद्राच्या जवळ आहे.
 • खेळाडूंना त्यांच्या या ठिकाणी मद्यपान करता येणार नाही.
 • इंग्लंडने राहण्यासाठी हे ठिकाण निवडले, कारण स्पर्धेतील १० पैकी ८ स्टेडियम या रिसॉर्टजवळ आहेत.

वेल्सचा संघ

 • वेल्सचा संघ दोहाच्या डेल्टा हॉटेल्स सिटी सेंटरमध्ये राहणार आहे.
 • ऑन-साइट स्पा, स्विमिंग पूल, फिटनेस सेंटर, स्पॅनिश रेस्टॉरंट आहेत.

बेल्जियमचा संघ

 • बेल्जियमचा संघ हिल्टन साल्वा बीचजवळीला एका रिसॉर्ट्वर थांबणार आहे.
 • या ठिकाणी थीम पार्क आहे.
 • यात ५४ प्रकारचे राइड्स, स्कूबा डायव्हिंग आणि गो-कार्टिंगसह वॉटर अॅडव्हेंचर पार्क आहे.

फ्रान्सचा संघ

 • फ्रान्स दोहा येथील अल-मेसिला हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहे.
 • हे अरबी शैलीच्या डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे.
 • त्यांचे एका रात्रीचे भाडे दीड लाख रुपये आहे.
 • या हॉटेलमध्ये ३० खाजगी पूलदेखील आहेत.

ब्राझीलचा संघ

 • ब्राझीलने राहण्यासाठी वेस्टिन दोहा हॉटेल निवडले आहे.
 • हे हॉटेल प्रत्येक स्टेडियमपासून जवळजवळ १७ मिनिटांच्या अंतरावर आहे.
 • या सिटी सेंटर हॉटेलमध्ये ४ रेस्टॉरंट, ३ स्विमिंग पूल, एक फिटनेस सेंटर आणि स्पा आहे.

अर्जेंटिना आणि स्पेन संघ

 • अर्जेंटिना आणि स्पेन च्या संघांनी राहण्यासाठी कतार विद्यापीठातील निवास स्थाने निवडली आहेत.
 • या निवास्थानांच्या सभोवताली प्रशिक्षण मैदाने आहेत.

हेही वाचा – National Sports Awards 2022 : क्रीडा पुरस्कारांची घोषणा, टेबल टेनिसपटू शरथ कमल यांना खेलरत्न; वाचा संपूर्ण यादी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -