घरक्रीडाफिफाचा दुसरा दिवसही रंगतदार

फिफाचा दुसरा दिवसही रंगतदार

Subscribe

फिफा विश्वचषक रशियात अगदी उत्साहात सुरू आहे. फिफाच्या दुसऱ्या दिवशी झालेले तिन्ही सामने कमालीचे झाले.

फिफा विश्वचषक रशियात अगदी उत्साहात सुरू आहे. फिफाच्या दुसऱ्या दिवशी झालेले तिन्ही सामने कमालीचे झाले. उरुग्वेविरुद्ध इजिप्त सामन्यात उरुग्वेने १-० ने तर मोरोक्कोविरुद्ध इराण सामन्यात इराणनेही १-० ने विजय मिळवला. तर सर्वात शेवटी झालेला स्पेनविरूद्ध पोर्तुगाल हा सामना मात्र बरोबरीत पार पडला.

उरुग्वे विरुद्ध इजिप्त

सर्वात पहिल्या झालेल्या ग्रुप ए च्या उरुग्वे विरुद्ध इजिप्तच्या सामन्यात उरुग्वेने विजय मिळवला. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात ९०व्या मिनिटाला उरुग्वेच्या जोस जिमेनेजकडून केल्या गेलेल्या गोलमुळे उरुग्वेने हा सामना जिंकला.
हा सामना रशियात एकटरिनबर्ग स्टेडियम वर पार पडला. उरुग्वे आणि इजिप्त या दोन देशाच्या संघात झालेल्या या सामन्यात इजिप्तचा स्टार खेळाडू मोहम्मद सलाह नसल्याने इजिप्तची नौका सुरूवातीपासूनच धोक्यात होती. खांद्याच्या दुखापतीमुळे सलाह राखीव म्हणून बाहेर बसला होता. लुईस सुआरेज आणि कवानी या स्टार खेळाडूमुळे उरुग्वेचा संघ मॅचमध्ये भक्कम स्थानावर होता. चढाओढीच्या झालेल्या या सामन्यात सुरूवातीपासूनच दोन्ही संघ एकमेकांवर हावी होते. सामन्याच्या पहिल्या होल्फमध्ये दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. अगदी शेवटच्या क्षणाला उरुग्वेच्या जोस जिमेनेजने केलेल्या गोलने उरुग्वेने सामन्यात विजय मिळवला.

- Advertisement -
fifa urg
सामना जिंकल्यानंतर आनंद साजरा करताना उरुग्वेचा संघ

मोरोक्को विरुद्ध इराण

ग्रुप बी च्या मोरोक्को विरुद्ध इराण या सामन्यात इराणने मोरोक्कोवर १-० ने विजय मिळवला. सुरुवातीपासूनच चुरशीच्या झालेल्या सामन्यात ९० मिनिटात एकही गोल झाला नाही. त्यामुळे दोन्ही संघाना अतिरिक्त वेळे देण्यात आली. या वेळेत मोरोक्कोच्या अझीझ बूहदौझ याने गोल पोस्टच्या दिशेने येणारा बॉल हेडरद्वारे बाहेर मारण्याच्या प्रयत्नात स्वत:च्या गोल पोस्टमध्ये मारुन ओन गोल करत सामना स्वत:हून इराणच्या पदरात टाकला.

iRAN VS morroco
मोरोक्को विरुद्ध इराण सामन्यातील एक क्षण

स्पेन विरूद्ध पोर्तुगाल

सर्वात शेवटी झालेल्या मात्र सर्वात रंगतदार असणारा स्पेनविरूद्ध पोर्तुगाल सामना बरोबरीत पार पडला. सामन्यात वन मॅन आर्मी बनत रोनाल्डोने केलेल्या हॅट्रीकची खास चर्चा झाली.
चुरशीच्या झालेल्या या लढतीत निर्णायक क्षणी पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने संघाला ३-३ अशी बरोबरी मिळवून दिली. सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघाच्या एक-एक गुण मिळाला.
सामन्याच्या सुरुवातीच्या चौथ्याच मिनिटाला स्पेनच्या नॅचोच्या चुकीमुळे पोर्तुगालला पेनल्टी मिळाली. रोनाल्डोने पेनल्टीचा पुरेपुर उपयोग करत संघाला पहिला गोल करून दिला. यानंतर स्पेनच्या डिएगो कोस्टाने २४ व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी मिळवून दिली. पुन्हा ४४ व्या मिनिटाला रोनाल्डोने दुसरा गोल करत पोर्तुगालला २- १ अशी आघाडी मिळवूम दिली.

- Advertisement -
spain vs port
स्पेन विरूद्ध पोर्तुगाल सामन्यातील एक क्षण

हाफ टाइमनंतर ५५ व्या मिनिटाला डिएगो कोस्टाने गोल करत पुन्हा एकदा संघाला बरोबरी मिळवून दिली. लगेचच पुढील तीन मिनिटांत स्पेनच्या नॅचोने तिसरा गोल केला आणि स्पेनने ३- २ अशी आघाडी घेतली. यानंतर सामना संपण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना स्पेनच्या खेळाडूकडून झालेल्या चुकीमुळे पोर्तुगालला फ्री किक मिळाल्यामुळे रोनाल्डोने गोलमध्ये रूपांतर करत संघाला ३- ३ अशा बरोबरीत आणून ठेवले. रोनाल्डोची वर्ल्डकपमधील ही पहिली तर फुटबॉल कारकिर्दीतील ५१ वी हॅट्रीक ठरली.

cr
ख्रिस्तियानो रोनाल्डो
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -