घरCORONA UPDATEVideo - रवी शास्त्री यांनी कोरोनाची तुलना केली विश्वकपशी म्हणाले...

Video – रवी शास्त्री यांनी कोरोनाची तुलना केली विश्वकपशी म्हणाले…

Subscribe

भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य कोच रवि शास्त्रीने कोविड १९ च्या विरोधातील लढाई ही विश्व कप जिंकण्यापेक्षा ही मोठी आहे. भारतात कोरोनामुळे आत्तापर्यंत ३५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ११ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

क्रिकेट टीमचे मुख्य कोच रवि शास्त्री यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हीडिओ टाकला आहे. या व्हीडिओत रवी शास्त्री यांनी लोकांना एक संदेश दिला आहे. या महामारीशी लढताना खेळाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवायला हवं. शास्त्री पुढे म्हणाले, आज कोरोनामुळे आपण एका वेगळ्या प्रकारच्या स्थितीला सामोरं जात आहोत. कोरोनाशी लढणं हे विश्व कप जिंकण्यासाठी केलेल्या मेहनतीसारखं आहे. जीथे तुम्ही सर्वस्व देऊन जिंकण्यासाठी प्रयत्न करता.

पुढे रवी शास्त्री म्हणतात, पण आपल्या समोर असलेला कोविड १९ हा साधारण विश्वकप नाहीये. हा सगळ्या विश्वकपमध्ये मोठा आहे. विश्वकपमध्ये केवळ ११ लोकं मैदानावर खेळतात पण कोरोनाच्या खेळात ४० कोटी लोकं मैदानात उतरली आहेत. तर चला आपण सगळ्यांनी एकत्र येत याचा सामना करूयात. आपण ४० कोटी जनतेने मिळून कोरोनाला हरवू यात. आणि हा विश्वकप जिंकूयात.

- Advertisement -

यावेळी रवी शास्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलं. ही लाढई जिंकायची असेल तर आपल्याला नियमांच पालन करण्याची गरज आहे. आपल्या जवळ असे एक पंतप्रधान आहेत जे पुढे येऊन या सगळ्यासी लढा देत आहेत.


हे ही वाचा – आयपीएलसाठी आशिया चषक रद्द करायला देणार नाही; पाकिस्तानचा भारताला इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -