Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा गौतम गंभीरनंतर कोहलीचा 'या' खेळाडूसोबत राडा, मॅक्सवेलनं केली मध्यस्थी अन्.. व्हिडीओ व्हायरल

गौतम गंभीरनंतर कोहलीचा ‘या’ खेळाडूसोबत राडा, मॅक्सवेलनं केली मध्यस्थी अन्.. व्हिडीओ व्हायरल

Subscribe

आयपीएल २०२३ च्या १६ व्या हंगामाला क्रिकेटप्रेमींकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. परंतु आरसीबी आणि लखनऊ जायंट्स या सामन्यात झालेला राडा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज स्टार फलंदाज विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद झाल्यानंतर नवीन उल हक यांच्यात राडा झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, यावेळी आरसीबीचा अष्टपैलू मॅक्सवेलने या राड्यात मध्यस्थी केल्यानंतर हा राडा रोखता आला. दरम्यान, या राड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कोहली आणि नवीन यांच्यामध्ये वाद होण्यासाठी सिराजचे १७वे षट्क कारणीभूत ठरले होते. १७ व्या षट्कातील अखेरच्या चेंडूवर सिराजला नो बॉल देण्यात आला होता. परंतु यावर सिराज नाराज झाला होता. पंचांच्या निर्णयापुढे त्याचे काही चालले नाही.

- Advertisement -

मात्र, सिराजने हा चेंडू काही गरज नसताना स्टम्पवर मारला होता. त्यावेळी नवीनने त्याला विचारले की, हे काय करतो आहेस? त्यावेळी सिराजने त्याला उत्तर दिले. त्यानंतर कोहली नवीनशी भिडला होता. दोन्ही संघांतील खेळाडू हा राडा मिटवण्यासाठी समोरा समोर आले होते. यावेळी कोहली आणि नवीन यांच्यात शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर राड्याला सुरूवात होणारच होती, तोपर्यंत मॅक्सवेल ने मध्यस्थी करत नवीनला दूर सारण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे कोहलीला पुढे जाण्याची सूचना केली.

- Advertisement -

वादावर विराटने सोडले मौन

गौतम गंभीर आणि नवीन उल हकसोबतच्या वादावर विराटने मौन सोडले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर रोमनचे सम्राट Marcus Aurelius यांच्या काही ओळी पोस्ट केल्या आहेत. त्याने लिहिले की, ‘आपण जे काही ऐकतो ते एक मत आहे, तथ्य नाही. आपण जे काही पाहतो तो एक दृष्टीकोन आहे, सत्य नाही.’


हेही वाचा : गौतम गंभीर वादावर विराट कोहलीने सोडलं मौन, इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत


 

- Advertisment -