घरक्रीडाटी-20 च्या मनोधैर्यासाठी लढाई

टी-20 च्या मनोधैर्यासाठी लढाई

Subscribe

भारत आणि न्यूझीलँड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना येथील वेस्टपॅक स्टेडीयमवर होणार आहे. सुरूवातीचे तीन सामने जिंकून भारताने मालिका खिशात घातली आहे.परंतु,चौथा सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळलेल्या भारतीय संघाने न्यूझीलँड संघासमोर नांगी टाकली. न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीपुढे भारताताची भक्कम फलंदाजाची फळी कोसळली होती. या मालिकेच्या समाप्तीनंतर तीन टी-20 सामन्यांची मालिकादेखील खेळवली जाणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकले त्या संघाचे मनोधैर्य नक्कीच वाढणार आहे.त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे.

अखेरच्या सामन्यात भारतीय संघात धोनीची निवड होण्याची शक्यता आहे. सामन्यात खेळण्यास एम.एस. धोनी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात धोनी मैदानावर खेळताना दिसण्याची शक्यता आहे. धोनी संघात परतल्यामुळे संघातून कोणत्या खेळाडूला डच्चू मिळेल, हे उद्याच्या सामन्यात कळेल. पण क्रीडा तज्ञांच्या मते दिनेश कार्तिकला संघातून वगळण्यात येऊ शकते. पदार्पणाच्या सामन्यात अवघ्या नऊ धावा करणार्‍या शुभमन गिलला आणखी संधी मिळण्याची शक्यता आहे. तिसर्‍या सामन्यापूर्वी धोनीच्या पायाचे स्नायू दुखावले गेल्याने दोन सामन्यांसाठी त्याला आराम देण्यात आला होता. आता तो संघात परतला आहे. पाचव्या सामन्यापूर्वी धोनीने कसून सराव केला आहे. े.

- Advertisement -

न्यूझीलंडला धक्का

अखेरच्या एकदिवसीय सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल दुखापतीमुळे अखेरच्या वनडे सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. अतिरिक्त सलामीवीर म्हणून न्यूझीलंड संघात कॉलिन मुन्रोला बोलवण्यात आले आहे. गप्टिलच्या दुखापतीवर उपचार सुरू असून तो फिजिओच्या निरिक्षणाखाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -